
चिपळूण ः डीबीजेत राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण
फोटो ओळी
- rat२३p२४.jpg ः KOP२३L९०८३९
चिपळूण ः येथील डीबीजे महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी विजेते.
डीबीजेत ''उत्सव माय मराठी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
चिपळूण, ता. २३ ः येथील डीबीजे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे ''उत्सव माय मराठीचा ''या उपक्रमांतर्गत विविध कार्यशाळा व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा नुकताच बक्षीस वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी मसापचे अध्यक्ष प्रा. गोणबरे, भावार्थचे प्रतिनिधी विवेक कदम ,उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ''उत्सव माय मराठीचा ''या उपक्रमांतर्गत प्रा. विनायक बांद्रे व स्नेहल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालनाची कार्यशाळा घेतली.
कथालेखन स्पर्धेत ''कृतज्ञता'' मानसी करंदीकर यांनी प्रथम क्रमांक, ''देवदासी -मुरळी'' अनिता खताते द्वितीय क्रमांक, ''कुठे हरवला तो'' श्रद्धा केतकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर निबंध लेखनामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गिरिजा चितळे हिने प्रथम, डीबीजेची मुक्ता पवार द्वितीय, डीबीजेचा आदित्य तांमुडकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत डीबीजेची लिना राजेशिर्के प्रथम, विद्या तांबे यांनी द्वितीय तर स्वाती गोरे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. भारतजीवन प्रभुखोत व प्राची तांबे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण-वाचन स्पर्धेत देवरूख कॉलेजची कीर्ती पंडित हिने प्रथम क्रमांक पटकावला. ''नदिष्ट ''या कादंबरीचे तिने परीक्षण केले होते तर कोल्हापूर येथील भारतजीवन प्रभुखोत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांनी ''उजव्या सोंडेच्या बाहुल्या''चे परीक्षण केले होते तर ''टाटायन'' या पुस्तकाचे परीक्षण करणारे मयुरेश सरदेसाई यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या संपूर्ण स्पर्धेचे प्रा. प्राजक्ता चितळे, प्रेमा जगताप, प्रा. गिरीराज पांडे, मनीषा दामले, प्रा. प्रदीप मोहिते, प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा. संगीता जोशी, प्रा. विनायक बांद्रे यांनी या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षणाचे काम पाहिले.
मसापचे अध्यक्ष गोणबरे यांनी मसाप व डीबीजे महाविद्यालय अशा प्रकारची एक चांगली भाषिक चळवळ कोकणामध्ये उभी करू शकतो. यासाठी महाविद्यालयाला सर्व प्रकारचे सहकार्य देण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी भावना व्यक्त केली. प्राचार्य माधव बापट यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.