''स्मृतिलीला'' पुरस्कारांचे मालवणात वितरण

''स्मृतिलीला'' पुरस्कारांचे मालवणात वितरण

swt2313.jpg
90897
मालवणः भरड येथे विविध क्षेत्रातील खेळाडूंना स्मृतिलीला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

‘स्मृतिलीला’ पुरस्कारांचे मालवणात वितरण
‘मालवण स्पोर्ट्स’चा उपक्रमः गुणवंत, अष्टपैलू व्यक्तिमत्वांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ : मालवण स्पोर्ट्स असोसिएशन व सकल भंडारी हितवर्धक संस्था आयोजित लीलाधर गणेश हडकर यांच्या तृतीय स्मृती प्रीत्यर्थ हडकर कुटुंबीयांच्या वतीने नंदिता पाटील पुरस्कृत सर्वोत्कृष्ट गुणवंत अष्टपैलू व्यक्तिमत्व स्मृतिलीला पुरस्कार ज्येष्ठ क्रिकेटपटू नरहरी चिंदरकर यांना देऊन गौरविण्यात आले. हॉलीबॉलपटू विलास हरमलकर, बॅडमिंटन प्रशिक्षक महेश परब, उदयोन्मुख टेबलटेनिसपटू आर्या दिघे, उदयोन्मुख क्रिकेटपटू मंदार माडये यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले.
येथील लिलांजली हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष दिघे तसेच मालवण स्पोर्ट्स अशोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये, सकल भंडारी हितवर्धक संस्था अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, मालवण टेबल टेनिस अॅकॅडमीचे विष्णू कोरगावकर, मालवणी कवी रुजारिओ पिंटो, देवदत्त उर्फ भाऊ हडकर, अंजली हडकर आदी उपस्थित होते.
यावेळी (कै.) लीलाधर हडकर यांच्या समवेत क्रिकेट खेळलेले उत्कृष्ट क्रिकेटपटू नरहरी चिंदरकर यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या पत्नी सुषमा चिंदरकर यांचाही सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट तसेच रुद्र शिरोडकर, सौरव के. पी., आयुष कदम या उदयोन्मुख खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला. व्हॉलीबॉलपटू विलास हरमलकर यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत खेळाडूंनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कवी पिंटो यांनी मालवणी कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. दिघे यांनीही जुन्या आठवणी सांगताना स्मृतिलीला पुरस्कार हा कार्यक्रम दरवर्षी घेऊन उचित खेळाडूंचा सन्मान करावा, असे सांगितले. मालवण स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी नंदू देसाई, पप्पू परब, नीळकंठ मालडकर, सकल भंडारी हितवर्धक संस्थेचे अजित गवंडे, प्रदीप वेंगुर्लेकर, मिलिंद झाड, अरुण दुधवडकर, संतोष नागवेकर, हडकर कुटुंबीय, आरोलकर कुटुंबीय, जयमाला मयेकर, सौ. माडये, जितेंद्र वाळके, प्राजक्ता हडकर, शुभांगी हडकर, व्हॉलीबॉलपटू अरविंद सराफ, राजा शंकरदास, मिनीन फर्नांडिस, वाघमारे, सुजन परब आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार अजय शिंदे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com