चंदन तस्करीतील संशयित दोडामार्गात

चंदन तस्करीतील संशयित दोडामार्गात

swt२३१४.jpg
९०८९९
दोडामार्गः चंदन तस्करी प्रकरणी येथून ताब्यात घेतलेल्या संशयितासह कर्नाटक पोलिस.

चंदन तस्करीतील संशयित दोडामार्गात
कर्नाटकातील गुन्हाः सेंट्रींग कामाच्या बहाण्याने वास्तव्य
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २३ः चंदन तस्करी प्रकरणात फरार असलेल्या संशयिताच्या कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथे येऊन मुसक्या आवळल्या. ताब्यात घेतलेला आनंद मारुती रामणनवर (वय २९, रा. बिदरभावी, ता. खानापूर) हा सेंट्रींग कामगार म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून शहरात काम करीत होता. कर्नाटक पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईमुळे हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल होता. तो फरार असल्याने पोलिस त्याच्या शोधत होते. कर्नाटक पोलिसांना त्याला ताब्यात घ्यायचे होते. संशयित आरोपी आनंद रामणनवर हा दोडामार्ग येथे राहत असल्याची कुणकुण कर्नाटक पोलिसांना लागली. पोलिस निरीक्षक बसवराज लमाणी, सहायक पोलिस उपनिरीक्षक एच. श्रीनिवासन, एन. बी. बेळवडी. एन. एम. मुल्ला, यू. बी. शिंत्री यांच्या पथकाने सापळा रचून दोडामार्गमध्ये प्रवेश केला. दोडामार्ग हद्दीत गोवा राज्याच्या सीमेवर एका भाड्याच्या खोलीत तो राहणाऱ्या रामणनवर याला सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिस तपासात गेल्या दोन महिन्यांपासून तो दोडामार्ग येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. झडती दरम्यान त्याच्याकडे असलेले पाच किलो चंदनही जप्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला कर्नाटक पोलिस ठाण्यात हजार हजर केले.
................
चौकट
स्थानिक पोलिस अनभिज्ञ
कर्नाटकातील आरोपी दोडामार्गमध्ये येऊन आसरा घेतो आणि काही दिवसांतच कर्नाटक पोलिस सापळा रचून दोडामार्गातून रातोरात त्याला उचलून घेऊन जातात; मात्र इतकी कारवाई होऊनही स्थानिक पोलिस मात्र याबाबत अनभिज्ञ होते.
...............
चौकट
आरोपी लपल्याची तिसरी घटना
परप्रांतीय गुन्हेगार गुन्हा करून पोलिसांपासून वाचण्यासाठी दोडामार्ग तालुक्यात येऊन लपत आहेत. कर्नाटक पोलिसांनी दोडामार्गात केलेली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एका गुन्ह्यातील आरोपी दोडामार्गमध्ये येऊन मासे विकण्याचा धंदा करीत होते; मात्र त्यांच्याही पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com