कणकवली : नगरपंचायत निधी

कणकवली : नगरपंचायत निधी

कणकवली, वैभववाडी, देवगड नगरपंचायतींना ५ कोटींचा निधी
कणकवली, ता. २३ : कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली, वैभववाडी आणि देवगड नगरपंचायतीसाठी ५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. राज्‍य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. त्‍यासाठी आमदार नीतेश राणे यांनी पाठपुरावा केला असल्‍याची माहिती भाजप कार्यालयाकडून देण्यात आली.
वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कणकवली नगरपंचायत हद्दीतील विविध कामांसाठी १ कोटी ५७ लाख, देवगड नगरपंचायत करिता १ कोटी ९३ लाख, तर वैभववाडी नगरपंचायत साठी १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तसेच यापूर्वी कणकवली नगरपंचायत करिता तब्बल १० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे कणकवली मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू आहे. आमदार नीतेश राणे यांनी तीनही नगरपंचायतींसाठी आणलेल्‍या या निधीतून शहरांत विकास कामे होणार आहेत. त्‍याबद्दल जनतेमधून समाधान व्यक्‍त होत असल्‍याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com