भोस्ते पुलासाठी खेड काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोस्ते पुलासाठी खेड काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भोस्ते पुलासाठी खेड काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भोस्ते पुलासाठी खेड काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By

भोस्ते पुलासाठी खेड काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

खेड ः शहरातील जगबुडी नदीजवळील भोस्ते पूल धोकादायक झाला असून, या ठिकाणी नवीन पूल बांधावा तसेच भोस्ते जगबुडी नदीपात्रातून नवीन पूल बांधण्याच्या मागणीचे निवेदन खेड काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. भोस्ते पुलाची अवस्था बिकट आहे. यावरून अवजड वाहतुकीस बंदी आहे. सतत वर्दळीचा हा पूल पादचारी, वाहनचालकांसाठी सोयीचा आहे; मात्र पूल धोकादायक झाल्याने अनर्थ घडण्याची शक्यता आहे. मटणमार्केट ते भोस्तेवरून विद्यार्थी व महिला गुडघ्याभर पाण्यातून ये-जा करत असतात. ही कसरत करताना नदीपात्रात असणाऱ्या मगरींपासून धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी पूल झाल्यास 1 कि. मी. पेक्षा जास्त अंतराची फेरी कमी होणार आहे तसेच या पुलाचा भोस्ते, अलसुरे, निळीक, आष्टी, शिव, कोंडिवली या गावांना फायदा होणार आहे. या दोन पुलांच्या उभारणीसाठी लक्ष घालण्याची मागणी निवेदनात केली आहे. यावर निर्णय घेण्याचे सकारात्मक आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रसंगी आमदार योगेश कदम यांच्यासह काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे, नॅशनल वर्कर्स कमिटीचे उपाध्यक्ष बशीर मुजावर, युवक तालुकाध्यक्ष स्वराज गांधी, विजय गुप्ता यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.