रत्नागिरी- गोखले, गणपत्ये यांना शौर्य पुरस्कार

रत्नागिरी- गोखले, गणपत्ये यांना शौर्य पुरस्कार

-rat२३p२१.jpg- KOP२३L९०८३६ रत्नागिरी ः माधवी भिडे, अमृता करंदीकर, सई ओक, धनश्री गोखले, डॉ. अश्विनी गणपत्ये भीमसेन रेगे.
जयंत अभ्यंकर, सिद्धांत पाटील, देवेश जोग, मनाली जोशी, ऋतुजा मुकादम, श्रीरंग जोगळेकर.
------------
सायकलपटू धनश्री गोखले, अश्विनी गणपत्ये यांना शौर्य पुरस्कार

चित्पावन ब्राह्मण मंडळ; भीमसेन रेगे यांना जीवनगौरव, सिद्धांतला समशेरबहाद्दर पुरस्कार

रत्नागिरी, ता. २३ ः येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार चिपळूणच्या सायकलपटू धनश्री गोखले आणि डॉ. अश्विनी गणपत्ये यांना जाहीर झाला आहे. थोरले बाजीराव पेशवे व मस्तानी पुत्र समशेर बहाद्दर पुरस्कार कॅडेट सिद्धांत पाटील (गुरूवर्य दादोजी कोंडदेव, सैनिकी शाळा, तासगाव) याला तर जीवनगौरव पुरस्कार उद्योजक भीमसेन रेगे यांना जाहीर प्रदान करण्यात येणार आहे.
या सर्व पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९०व्या वर्धापनदिनी सोमवारी (ता. २७) समारंभपूर्वक वितरित करण्यात येणार आहेत. मंडळाचा वर्धापनदिन २७ मार्चला सायं. ४.३० ते ७ या वेळेमध्ये मंडळाच्या जोशी पाळंदमधील श्री भगवान परशुराम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनय नातू व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे तर समशेरबहाद्दर पुरस्कार प्रशस्तीपत्र व रुपये पाच हजार रुपये, सन्मानपत्र असे स्वरूप आहे. बडे महिला पुरस्काराचे स्वरूप साडी, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे.
मंडळातर्फे (कै.) सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार माधवी भिडे (संगमेश्वर), अमृता करंदीकर (रत्नागिरी) आणि सई ओक (गुहागर) यांना देण्यात येणार आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील अध्यापक जयंत अभ्यंकर यांना देण्यात येईल. चित्पावन मंडळाच्या (कै.) ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थी देवेश जोग याला आदर्श विद्यार्थी आणि मंडळाच्या (कै.) सौ. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर मुलींच्या वसतिगृहातील आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार मनाली जोशी हिला देण्यात येणार आहे. युवा गौरव पुरस्कार हवाईसुंदरी झाल्याबद्दल ऋतुजा मुकादम, कुमारगौरव पुरस्कार अल्पावधीत ऑर्गनवादनात प्रावीण्य मिळवणाऱ्या श्रीरंग जोगळेकर याला जाहीर झाला आहे. याशिवाय मंडळाचे सहकार्यवाह अनंत आगाशे यांच्या यशोगाथा पुस्तकाबद्दल, मंडळाच्या कोषाध्यक्ष राधिका वैद्य यांची कन्या प्राजक्ता सीए झाल्याबद्दल आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सीए मुकुंद मराठे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. सातत्याने पर्यटन परिषदा घेऊन काम करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेला मंडळातर्फे अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
-----------
चौकट १
७५ वर्षांवरील सदस्यांसह विद्यार्थ्यांचा सन्मान
या कार्यक्रमात गणित व संस्कृतमधील गुणवंतांना लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पारितोषिके, समाजशास्त्र व मराठीतील गुणवंत विद्यार्थ्यांना (कै.) केशव अच्युत व (कै.) सुलोचना केशव जोशी पारितोषिके दिली जाणार आहेत. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार आणि विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. (कै.) सत्यभामाबाई फडके निधीतून एका महिलेस अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मंडळाच्या या ९०व्या वर्धापनदिन सोहळ्यात जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com