रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

फोटो ओळी
-rat२३p३७.jpg ःKOP२३L९०८९३ रत्नागिरी ः साळवी स्टॉप येथे मधुबनी चित्राच्या माध्यमातून भित्तीचित्र साकारणारे सर्वंकष विद्यामंदिरचे विद्यार्थी.
------
सर्वंकष विद्यामंदिर शाळेचा
भित्तीचित्रातून सामाजिक संदेश
रत्नागिरी ः येथील सर्वंकष विद्यामंदिर शाळेच्या सहावी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे भित्तीचित्र साळवी स्टॉप येथे साकारले. यासाठी रत्नागिरी नगर पालिकेचे सहकार्य लाभले. या चित्रासाठी बिहारमधील ‘मधुबनी’ या प्रसिद्ध लोककला चित्रशैलीचा वापर करण्यात आला. अशाप्रकारे भित्तीचित्रासाठी लोककलेचा उपयोग करणे हा नावीन्यपूर्ण प्रयोग शाळेकडून करण्यात आला. सामाजिक संदेशासोबत लोकचित्र शैली लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. ही संकल्पना प्रशालेचे चित्रकला शिक्षक कमल आणि योगेश यांची आहे. यात सहावीच्या श्रावणी वायंगणकर, सारंगी साळुंखे, निधी सावंत, शुभम चिके, सातवीच्या रेया अमरावत, प्रिशा इंदुलकर, नहयान फणसोपकार या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेऊन कला सादर केली. मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल व पर्यवेक्षिका झेबा परकार यांचे मार्गदर्शन लाभले.
--------

फोटो ओळी
-rat२३p३२.jpg- KOP२३L९०८५९ रत्नागिरी ः भिडे हार्मोन लॅबतर्फे देणगी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या अॅड. भावे यांच्याकडे देताना चंद्रशेखर पटवर्धन. सोबत अन्य.


भिडे हार्मोन लॅबतर्फे मूकबधिर विद्यालयास देणगी
रत्नागिरी ः भिडे हार्मोन लॅब रिसर्च अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दी न्यु एज्युकेशन सोसायटीच्या केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयासाठी ५० हजार रुपयांची देणगी संस्थेला प्रदान करण्यात आली. देणगी रकमेचा धनादेश ट्रस्टचे विश्वस्त चंद्रशेखर पटवर्धन यांनी संस्थेच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष अॅड. सचिन शिंदे, सचिव दिलीप भातडे, मुख्याध्यापक किशोर लेले, शेखर लेले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
------------

फोटो ओळी
-rat२३p३३.jpg ः KOP२३L९०८६० रत्नागिरी ः माहेर संस्थेत पुस्तकांच्या गुढीला अभिवादन करताना महिला.
-----------
माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी
रत्नागिरी ः येथील माहेर संस्थेमध्ये गुढीपाडवा हा सण उत्साहाने पार पडला. या गुढीपाडव्यानिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून माहेर संस्थेत पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ते ज्या पुस्तकातून मिळते ती पुस्तके वाचणे, माहिती करून घेणे हे फार गरजेचे आहे. त्या निमित्ताने पुस्तकांचा सन्मान व्हावा यासाठी मराठी नवीन वर्षाच्या दिनानिमित्त पुस्तकरूपी गुढी उभारण्यात आली. संस्थेतील प्रवेशितांना पुस्तकाचे महत्व पटवून देण्यासाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या संकल्पनेने साकारण्यात आला.

--------
ओम् साई मित्रमंडळातर्फे २६ ला सामूहिक रामरक्षा पठण

रत्नागिरी ः श्रीरामनवमी निमित्त नाचणे-साळवी स्टॉप मार्गावरील ओम साई मित्रमंडळातर्फे २६ मार्चला सायंकाळी ६ वा. मंडळाच्या सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप यांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामरक्षा हे प्रासादिक स्तोत्र त्यातील गेयता आणि लयबद्धता यामुळे अतिशय लोकप्रिय असून त्याचा पाठ घरोघरी नित्यनेमाने केला जातो. उत्तम आयुरारोग्य आणि संकटमुक्ती यांसाठी या स्तोत्राचा पाठ भाविक अतिशय श्रद्धेने आणि भावपूर्णपणे करत असतात. या स्तोत्राच्या सामूहिक पठणाचेही अनेक लाभ आहेत. प्रभू श्री रामचंद्रांच्या आदर्श रामराज्याच्या धर्तीवर धर्म, राष्ट्र आणि समाज यांच्या उन्नतीसाठी सामूहिक उपासना शीघ्र फलदायी ठरते. याच उद्देशाने ओम साई मित्रमंडळातर्फे सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप यांचे रविवारी (ता. २६) मार्च या दिवशी सायं. ६ वा. मंडळाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल, युवा, माता, भगिनी, वृद्ध यांसह सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी आणि श्रीरामभक्त आदी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओम साई मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com