मंडणगड ः राजकीय द्वेषापोटी विकासकामांना अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः राजकीय द्वेषापोटी विकासकामांना अडथळा
मंडणगड ः राजकीय द्वेषापोटी विकासकामांना अडथळा

मंडणगड ः राजकीय द्वेषापोटी विकासकामांना अडथळा

sakal_logo
By

फोटो ओळी
-Rat२३p३९.jpg ः येत आहे,
मंडणगड ः पत्रकार परिषदेत माहिती देताना शहरविकास आघाडीचे गटनेते विनोद जाधव व सर्व नगरसेवक.


राजकीय द्वेषापोटी विकासकामांना अडथळा
विनोद जाधव ; मंडणगडातील सत्ताधाऱ्यांवर टीका
मंडणगड, ता. २३ ः स्थायी समितीने अधिकारांचे गैरवापर करून मंडणगड नगरपंचायतीचे विरोधी गटातील नगरसेवकांची आमदार योगश कदम यांनी नगरविकास खात्यांच्या नावीन्यपूर्ण योजनेतून मंजूर केलेली १ कोटी ९५ लाखांची टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली १७ कामे नाकारली. स्थायी समिती आपल्या अधिकारांचा गैरवापर करून जनतेच्या विकासाची कामे निधी असतानाही रखडवत असल्याची टीका गटनेते विनोद जाधव यांनी केली. शहर विकास आघाडीच्यावतीने नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या संदर्भात चर्चा, विनंत्या, अर्ज करून कोणताही फरक न पडल्याने विरोधी गटनेते नगरसेवक विनोद जाधव हे कलम ३०८ अंर्तगत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे अपिलात गेले होते. या संदर्भात वादी, प्रतिवादी व प्रशासन यांची भूमिका व कागदपत्रांचा अभ्यास करून निकाल दिला असून, विनोद जाधव यांचे अपिल अंशत: मान्य करून ३१ मार्च २०२३ पूर्वी निधी खर्च होणे कामी संबंधितांना सूचित केले आहे. या निकालाची प्रत प्राप्त झाल्याने नगरसेवक जाधव यांनी २३ मार्चला या संदर्भात पत्रकारांना सूचित केले. या वेळी नगरसेवक आदेश मर्चंडे, योगेश जाधव, नगरसेविका सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, प्रवीण जाधव, नीलेश गोवळे उपस्थित होते. या वेळी जाधव यांनी सत्ताधाऱ्यांनी विकासकामात राजकारण न आणण्याचे आवाहन केले. स्थायी समितीने विकासकामात राजकारण आणल्याने येथील जनता विकासकामापासून वंचित राहिली असल्याची प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी केली आहे.
विरोधकांना अडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेत आल्यापासून किती विकासकामे कामे मंजूर केली आहेत, असा सवालही उपस्थित केला. सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहेत, मतासांठी जनतेच्या मागे फिरणारे सत्ताधारी जनतेला विसरले आहेत व विकासकामे करण्यापेक्षा विरोधकांची विकासकामे अडवण्यातच धन्यता मानत असल्याचा गंभीर आरोप उपस्थित नगरकसेवकांमधून करण्यात आला. शहराच्या विकासाकरिता सत्ताधारी व विरोधक हा खेळ खेळण्यापेक्षा एकत्रित काम करण्याचे व त्याकरिता शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकार परिषदेस उपस्थित सर्व नगरसेवकांनी शहरविकास आघाडीच्यावतीने या वेळी केले.