
स्वामी समर्थ प्रकटदिन कुडाळात उत्साहात साजरा
swt2327.jpg
90963
कुडाळः येथे प्रकटदिनानिमित्त स्वामी समर्थ मंदिरात केलेली आरास.
स्वामी समर्थ प्रकटदिन कुडाळात साजरा
कुडाळ ः येथील औदुंबरनगर येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात वर्दळ सुरू होती.
..............
इन्सुलीत रविवारी महाआरोग्य शिबिर
बांदाः अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि उत्कर्ष युवक कला-क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ यांच्यावतीने ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी रविवारी (ता. २६) महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात इन्सुली व पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औषधपुरवठा करण्यात येणार आहे. हे शिबिर सांस्कृतिक सभागृह इन्सुली-कोनवाडा येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे रोगनिदान विकृती विज्ञानचे डॉ. राजेश उकीये, स्वास्थवृत्त तज्ज्ञ डॉ. योगेश शिंदे, पंचकर्मचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता गावकर, डॉ. दीपश्री गावस, औषध निर्माता भक्ती चव्हाण, परिचारिका विनिता गाड, सिद्धेश आईर, सागर धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिर प्रमुख स्वागत नाटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी केले आहे.