राजापूर-वाटूळला होणार शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

राजापूर-वाटूळला होणार शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

फोटो ओळी
-rat२३p४९.jpg- KOP२३L९०९७६ राजापूर ः आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमवेत उपजिल्हा रुग्णालय उभारणीबाबात चर्चा करताना आमदार राजन साळवी.
---------

वाटूळला शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
आरोग्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता ; रुग्णांसह नागरिकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील वाटूळ येथे सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणी होण्याची शक्यता मावळलेली असताना आता त्या ठिकाणी शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वाटूळ येथे सुमारे शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता मिळाली असून लवकर त्यासाठी आर्थिक तरतूद होवून संबंधित हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.
मुंबई-गोवा महामाार्गवर वाहनांची सातत्याने मोठ्याप्रमाणात वर्दळ असून त्यातून अनेकवेळा अपघात होवून त्यामध्ये अनेकांना जीव गमावावा लागला आहे. त्यातच, महामार्गावर सोयीसुविधांयुक्त कोणतेही हॉस्पिटल नसल्याने तालुक्यासह अन्य परिसरातील रूग्णांवर अधिक उपचारासाठी मुंबई किंवा कोल्हापूर गाठावे लागते. मात्र, प्रवासाच्यादृष्टीने दोन्ही ठिकाणी लांब असल्याने रुग्णालयामध्ये वेळेमध्ये न पोहचल्यास अनेकवेळा रुग्णांना नाहक जीव गमवावा लागतो. सद्यस्थितीमध्ये वाटूळ येथील सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी काहीशी मावळली आहे. अशा स्थितीमध्ये आता या ठिकाणी शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णालयाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्यादृष्टीने राज्याचे आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या समवेत त्यांच्या दालनामध्ये आमदार श्री. साळवी यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये वाटूळ येथे शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आली.
---------
चौकट
लांजा ग्रामीण रुग्णालयाचे कामही सुरू होणार

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासमवेत झालेल्या बैठरीमध्ये लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला देण्यात आलेली स्थगिती उठवून लवकरच कामाला सुरवात करण्याचे श्री. सावंत यांनी आश्‍वासित केल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली. जिल्हा आणि तालुका ग्रामीण रूग्णालयाचतील रिक्त पदेही लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री श्री. सावंत यांनी दिल्याची माहिती आमदार श्री. साळवी यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com