पान एक-पाटमध्ये दुचाकी अपघातात नेरुरमधील तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-पाटमध्ये दुचाकी अपघातात
नेरुरमधील तरुणाचा मृत्यू
पान एक-पाटमध्ये दुचाकी अपघातात नेरुरमधील तरुणाचा मृत्यू

पान एक-पाटमध्ये दुचाकी अपघातात नेरुरमधील तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पान एक

९१००८
९१००९

पाटमध्ये अपघातात
नेरुरच्या तरुणाचा मृत्यू
दुचाकीला मोटारीची धडक; पत्नीसह तिघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः दुचाकीला मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कृष्णा चव्हाण (वय ४५, रा. नेरुर, आदर्शनगर) यांचे उपचारादरम्यान गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांची पत्नी व दोन लहान मुलगे असे तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात पाट-गांधीनगर येथे काल (ता. २२) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर पलायन केलेल्या मोटारचालकावर निवती पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
याप्रकरणी निवती पोलिस ठाण्याच्या राधिका चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्यानिमित्त म्हापण येथे जत्रा असते. या जत्रेसाठी काल सायंकाळी उशिरा नेरुर-आदर्शनगर येथील कृष्णा चव्हाण दुचाकीने पत्नी राधिका आणि मुलगा कौस्तुभ (वय ११) व श्रेयस (वय ८) या तिघांना घेऊन निघाले होते. या दरम्यान रात्री ८ च्या सुमारास ते पाट- गांधीनगर येथील लाकूड गिरणीनजीक आले असता मागून येणाऱ्या मोटारीची दुचाकीच्या उजव्या हँडलला धडक लागली. यामुळे ते सर्वजण दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकीचालक कृष्णा चव्हाण गंभीर जखमी झाले. तर पत्नी राधिका, मुलगे कृष्णा व श्रेयस हे जखमी झाले. या सर्वांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र, कृष्णा चव्हाण यांची हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पीएसआय सुधीर कदम, पोलिस हवालदार एस. पी. कांबळे, पराग पोकळे यांनी पंचनामा केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक एस. आर. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पंढरीनाथ नांगरे करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात मोटारचालकावर निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.