बिळवस ग्रामपंचायतीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

बिळवस ग्रामपंचायतीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव

swt2336.jpg
91011
बिळवसः गुणवंत महिलांचा गौरव करताना सरपंच मानसी पालव. सोबत कृषी अधिकारी गोसावी आणि मान्यवर.

बिळवस ग्रामपंचायतीतर्फे
कर्तृत्ववान महिलांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. २३ : सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक महिलेने स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज आहे. यासाठी बिळवस ग्रामपंचायतीच्या वतीने येथील महिलांना जे सहकार्य लागेल, ते सर्व सहकार्य दिले जाईल. आज महिला सर्व क्षेत्रांत पुढे जात असून हे आम्हा सर्वांना अभिमानाचे आहे. या गावातील महिला देशपातळीवर विविध क्षेत्रांत कर्तृत्ववान कामगिरी करून चमकाव्यात. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांना पाठबळ दिल्यास आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल, असे प्रतिपादन सरपंच मानसी पालव यांनी बिळवस येथे केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बिळवस ग्रामपंचायतीच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन सरपंच पालव यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर अनुपमा पालव, रंजना पालव, ग्रामविकास अधिकारी युगल प्रभू, अंजली पालव, अमृता पालव, चैताली पालव, कृषी अधिकारी संजय गोसावी, प्रकाश फणसेकर, संतोष पालव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात अश्विनी भोगले, नीलम भोगले, सुषमा पालव, अनुपमा पालव, इंदुमती पालव, प्रज्ञा फणसे, अंकिता मेस्त्री, क्रांती तोरस्कर, सानिका पालव, क्रांती पालव या कर्तृत्ववान महिलांचा ग्रामपंचायतीच्यावतीने विशेष गौरव करण्यात आला. श्री. गोसावी यांनी, महिलांसाठी विविध शासकीय योजना असून या योजनांचा लाभ महिलांनी घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी पंचायत समिती पातळीवर आम्ही सर्व सहकार्य करण्यास नेहमी तयार आहोत. बिळवस ग्रामपंचायतीचा हा उपक्रम स्तुत्य असून सर्वांसाठी आदर्श असा आहे, असे सांगितले. ग्रामसेवक युगल प्रभुगावकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com