देवगडात मच्छीमाराचा आकस्मिक मृत्यू

देवगडात मच्छीमाराचा आकस्मिक मृत्यू

देवगडात मच्छीमाराचा
आकस्मिक मृत्यू
देवगड, ता. २३ : येथील एका मच्छीमाराचा मृत्यू झाला. लक्ष्मण हनमप्पा टेंगुटी (वय १७, रा. कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. येथील खाडी किनारी चक्कर येऊन पडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंगुडी हा येथील एका नौकेवर मच्छीमार होता. सकाळी खाडीकिनारी चक्कर येऊन तो जमिनीवर पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार राजन जाधव करीत आहेत.
.........................
रस्त्यावर झाड कोसळून
माजगावात वाहतूक ठप्प
सावंतवाडी, ता. २३ ः माजगाव नाला परिसरात रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. संबंधित झाड विद्युत तारांवर कोसळल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही वर्दळ नसल्यामुळे अनर्थ टळला. ग्रामस्थांच्या मदतीने झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com