पावशीतील शिबिरात 64 जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीतील शिबिरात 64 जणांचे रक्तदान
पावशीतील शिबिरात 64 जणांचे रक्तदान

पावशीतील शिबिरात 64 जणांचे रक्तदान

sakal_logo
By

swt२४१.jpg
91082
पावशीः रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना माजी सरपंच बाळा कोरगावकर व अन्य.

पावशी शिबिरात ६४ जणांचे रक्तदान
कुडाळः पावशी येथे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजेंद्र नाईक, बबन बोभाटे, कृष्णा धुरी, दिनेश वारंग, राजू गावंडे, रुपेश पावस्कर आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक पदाधिकारी बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, वसंत भोगटे, गणेश पावस्कर, दिव्या खोत, निकिता शेळके, दिव्या दळवी, बाबू वायंगणकर, तुषार शेलटे, मनीष तोटकेकर, कन्हैया वायंगणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
..................
swt२४३.jpg
91084
सावंतवाडीः पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मार्गदर्शन केले.

सावंतवाडीत पोलिसांचा नागरिकांशी संवाद
सावंतवाडीः येथील पोलिस प्रशासनाच्यावतीने ‘संवाद पंधरवडा’निमित्त ज्येष्ठ नागरिक समिती व महिला समिती यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध समस्या व पोलिसांकडून मदत, डायल ११२ यंत्रणा, महिला सुरक्षा, सायबर मोबाईल ॲप याबाबत जनजागृती आदी विषयांवर पोलिस उपनिरीक्षक अमित गोते व महिला पोलिस संगीता पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथील ज्येष्ठ नागरिक समितीच्या कार्यालयात हा उपक्रम घेण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांकडून शाल व श्रीफळ देऊन पोलिसांचा सन्मान करण्यात आला.