अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी 50 कोटीची भरीव तरतूद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी 50 कोटीची भरीव तरतूद
अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी 50 कोटीची भरीव तरतूद

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी 50 कोटीची भरीव तरतूद

sakal_logo
By

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी ५० कोटीची भरीव तरतूद

मच्छीमार विकास निधी ; मत्स्य व्यवसाय वाढीला मदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असलेल्या मत्स्य व्यवसायासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. सुमारे ५० कोटीचा हा विकास निधी असून माध्यमातून मत्स्य व्यवसाय उद्योग वाढीला मदत होणार आहे.
यंदा जाहीर अर्थसंकल्पात या मासेमारीवर अवलंबून असलेल्या गावांसाठी मच्छीमार विकास निधी अंतर्गत ५० कोटींचा मच्छीमार विकास निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचा जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय विकासासह किनारपट्टीवर वसलेल्या गावांचाही विकास होणार आहे. जिल्ह्यात १६७ किमी लांबीचा सागर किनारा लाभला आहे. त्यावर उपजीविका असणाऱ्या कुटुंबाची संख्या मोठी आहे. सर्वात अधिक लांबीचा सागर किनारा रत्नागिरी तालुक्याला (५६ किमी) लाभला आहे. त्याखालोखाल गुहागर ३८ किमी, दापोली ३५ किमी, मंडणगड २० किमी आणि राजापूर १८ किमी सागर किनारा आहे.
जिल्ह्यात २०२१-२२ च्या सागरी हंगामात १ लाख १ हजार २८८ मेट्रीक टन मासळी उत्पादन झाले आहे. समुद्रात मत्सव्यवसाय सहकारी सस्थांची संख्या ४१ हजार ४० असून एकूण मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या २ हजार ९३६ आहे. त्यात २ हजार २५२ बोट या यांत्रिक बोटी असून सर्वांना मासेमारी साठी समुद्रात जाताना डिझेलची आवश्यकता असते.
जिल्ह्यात मासे उतरविणाच्या केंद्राची एकूण संख्या ४६ आहे. मासेमारीवर अवलंबून असलेल्या गावांसाठी मच्छीमार विकास निधी अंतर्गत ५० कोटींचा मच्छीमार विकास निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचा जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय विकासासह किनारपट्टीवर वसलेल्या गावांचाही विकास होणार आहे. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यासोबतच मासेमारी साठीचा डिझेल परतावा आणि प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या क्षेत्रात मच्छीमारांना त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठीची घोषणा पाठोपाठ झाली आहे.
-
दृष्टीक्षेपात
मत्सव्यवसाय सहकारी सस्थांची संख्या- ४१ हजार ४०
मासेमारी बोटींची संख्या- २ हजार ९३६
यांत्रिकी बोटीची संख्या- २ हजार २५२
मासे उतरविणाच्या केंद्राची संख्या- ४६