वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

swt246.jpg
91107
वेंगुर्लेः येथे भाजपविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

वेंगुर्लेत काँग्रेस कार्यकर्त्यांची
भाजपाविरोधात घोषणाबाजी
वेंगुर्ले, ता. २४ः भाजपने राहुल गांधींच्याविरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षड्यंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्या पद्धतीने मोदी सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही काँग्रेसच्यावतीने निषेध करतो, अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी येथे केली. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  
शेख पुढे म्हणाले की, ‘‘हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजप राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी ज्या पद्धतीने मोदी सरकारच्या कुकर्मांची लक्तरे वेशीवर टांगत आहेत, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच राहुल यांना संसदीय कामकाजापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश लोक स्वातंत्र्य सैनिकांवर असेच गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकत होते. त्याचप्रमाणे आजचे सत्ताधारी जनतेसाठी लढणाऱ्या आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या मोदी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींवर सूडबुद्धीने कारवाई करत आहे. गोऱ्या ब्रिटिशांना काँग्रेसने देशातून हाकलून दिले, आता या काळ्या ब्रिटिशांनाही सत्तेवरून हाकलण्याची वेळ आली आहे.’’
यावेळी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ले पंचायत समिती माजी उपसभापती सिद्धेश परब, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, रेडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर, मयुरेश घाडी, साईश परब, किरण मुसळे, पांडुरंग सावंत, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश हरमलकर, तन्मय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com