जैवइंधन प्रकल्पाचे ओटवणेत भूमिपूजन

जैवइंधन प्रकल्पाचे ओटवणेत भूमिपूजन

swt247.jpg
91108
ओटवणेः बायोकोल जैवइंधन प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी सूरजी राऊळ, सरपंच आत्माराम गावकर, संतोष कासकर आदी.

जैवइंधन प्रकल्पाचे ओटवणेत भूमिपूजन
‘मायबा’चा पुढाकारः शेतीतील कचऱ्यापासून बनणार जैव कोळसा
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २४ः मायबा क्लिनफ्युल्स प्रा. लि. व मायबा फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यावतीने बायोकोल जैवइंधन प्रकल्पाचे येथे भूमिपूजन करण्यात आले. बायोकोल म्हणजेच जैव कोळसा आणि हा तयार करण्याच्या प्रकल्पासाठी ओटवणे येथे जागा घेत त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ज्येष्ठ संचालक सूरजी राऊळ (सांगेली) यांच्या हस्ते पार पडला. माडखोल येथेही या कंपनीचा वेगळा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाची ओटवणे येथे सुरुवात केली जाणार आहे.
शेतकऱ्याच्या शेतीतील टाकाऊ, अनावश्यक कचरा योग्य हमीभावाने शेतकऱ्यांकडून कंपनी खरेदी करणार असून त्यापासून जैव कोळसा तयार करण्यात येणार आहे. यातून ओटवणे दशक्रोशीसह तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीचे संचालक व्यवस्थापक स्वप्नील तेजम यांनी केले. यावेळी ग्राम रोजगार, चॅनल पार्टनर कंपनीचे संचालक यांनीही प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देत अनेक अडचणी झेलत प्रकल्प साकार झाल्याबाबत समाधान व्यक्त केले. प्रकल्पाच्या उभारणीसाठी संचालकांसह ग्राम उद्योजक चॅनल पार्टनर झटत असून प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने त्यापासून पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. येत्या दोन ते तीन महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक पंचक्रोशीतील होतकरू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे व्यवस्थापक हरिहर मयेकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ओटवणे सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, गावप्रमुख रवींद्र गावकर, जमीन मालक रवींद्र म्हापसेकर, पोलिस पाटील लक्ष्मण गावकर, मनोहर मयेकर, संचालक लक्ष्मीकांत राऊळ, अनंत सावंत, बंसिधर सांगेलकर तसेच कंपनीचे सर्व अन्य संचालक मंडळ, ग्रामोद्योजक, गाव प्रतिनिधी, भागधारक सभासद उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com