खारेपाटण कॉलेज येथे 
ॲथलेटिक्‍स प्रशिक्षण शिबिर

खारेपाटण कॉलेज येथे ॲथलेटिक्‍स प्रशिक्षण शिबिर

खारेपाटण कॉलेज येथे
ॲथलेटिक्‍स प्रशिक्षण
खारेपाटण, ता.२४ : येथील शेठ न.म. विद्यालय, ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे १५ ते २५ एप्रिल या दरम्‍यान जिल्‍हास्तरीय ॲथलेटिक्‍स प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण भागातूनही राष्‍ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या दृष्‍टीने हे शिबिर होणार असल्याची माहिती संस्थेने दिली.
दहा दिवसीय शिबिरामध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच खारेपाटण पंचक्रोशीतील खेळाडूंना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व खारेपाटण हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. सानप यांनी केले आहे.
या ॲथलेटिक शिबिरामध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, भाला फेक, थाळीफेक, शटल रन आदी मैदानी क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण हे ५ वर्ष ते १८ वर्ष या वयोगटातील मुले व मुलींसाठी असेल. सदर प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थींच्या निवासाची सोय केली जाणार आहे. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com