भिरवंडेकर मराठा समाजाचा २ एप्रिलला मुंबईत मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडेकर मराठा समाजाचा 
२ एप्रिलला मुंबईत मेळावा
भिरवंडेकर मराठा समाजाचा २ एप्रिलला मुंबईत मेळावा

भिरवंडेकर मराठा समाजाचा २ एप्रिलला मुंबईत मेळावा

sakal_logo
By

भिरवंडेकर मराठा समाजाचा
२ एप्रिलला मुंबईत मेळावा
कणकवली,ता. २४ ः भिरवंडे (ता.कणकवली) गावातील ग्रामस्थांच्या मुंबई भिरवंडेकर मराठा मंडळाच्यावतीने ९३ वा वर्धापन दिन आणि स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २ एप्रिलला मुंबईतील मुलुंड येथील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्रामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार अरविंद सावंत, आमदार विक्रम सावंत (जत), ब्रिगेडियर सुधीर सावंत, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश सावंत, संजना सावंत, डॉ. प्रथमेश सावंत, साई संस्थान शिर्डीचे उपाध्यक्ष जगदीश सावंत, डॉ. उमा सावंत आदी उपस्थित राहणार आहे. २ एप्रिलला दुपारी साडेतीन ते रात्री साडेआठ दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दुपारी महिलांचे हळदीकुंकू त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी मराठी विडंबन गाण्याच्या धमाल कार्यक्रम ‘बेताल झालेला सूर’ आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत असे कार्यक्रम होणार आहेत.