‘रोंबाट’ने डोळ्यांचे पारणे फेडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रोंबाट’ने डोळ्यांचे पारणे फेडले
‘रोंबाट’ने डोळ्यांचे पारणे फेडले

‘रोंबाट’ने डोळ्यांचे पारणे फेडले

sakal_logo
By

91130
91131
ओरोस ः ‘रोंबाट’ कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेले विविध कलाविष्कार लक्षवेधी ठरले.


‘रोंबाट’ने डोळ्यांचे पारणे फेडले

ओरोसमध्ये सादरीकरण; चित्ररथ देखावे, सोंगांसह विविध खेळांनी रंगत

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः भाजप ओरोस मंडळ व अमोल ग्रुप ओरोस आयोजित ‘रोंबाट’ कार्यक्रम सुमधुर गीतांच्या तालावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारीत एकापेक्षा एक लक्षवेधी चित्ररथ देखावे, सोबत पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरले.
भाजपा ओरोस मंडळ आणि अमोल ग्रुप ओरोसच्यावतीने गोविंद सुपरमार्केट शेजारील मैदानावर भव्य रोंबाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर, संतोष वालावलकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, सरपंच आशा मुरमुरे, उपसरपंच महादेव घाडीगावकर, पांडुरंग मालवणकर, परशुराम परब, अंकुश जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुप्रिया वालावलकर म्हणाल्या, ‘‘ओरोस हा एक ग्रामीण भाग होता; मात्र जिल्हा निर्मितीच्यावेळी या गावाची ओळख मुख्यालयासाठी निश्चित करण्यात आली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी मुख्यालयासाठी दिल्या. त्यानंतर ओरोसचा विकास होत आहे. अनेक विकासक या ठिकाणी आले असून त्यांच्या माध्यमातून विकास होत आहेत. लवकरच या गावची नगरपंचायत होईल, अशी आशा आहे.’’ राजन तेली यांनी, रोंबाटाचा हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे. असे नावीन्यपूर्ण कार्यक्रम फक्त कुडाळ तालुक्यातच पाहायला मिळतात. सर्वजण वाट पाहत असलेली नगरपंचायत वर्षभरात होईल, अशी ग्वाही दिली. प्राधिकरणमधील रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे, असे सांगत प्राधिकरणमधील सर्व प्रश्न पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर रोंबाट कार्यक्रमाला सुरुवात झाली.
ओरोस येथे आयोजित ‘रोंबाट’मध्ये भव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले. श्री. स्वामी समर्थ, साई बाबा, विठ्ठल रखुमाई यांच्या देखाव्यातून सुरुवात झाली. त्यांनतर संगीत साथीवर एकापेक्षा एक सरस गौळण व भारुडांवर सर्वच कलाकारांनी बेभान होऊन ताल-सुराच्या ठेक्यावर नाचत कलाविष्कारांचे अप्रतिम सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
..............
चौकट
मुख्यालयातील पत्रकारांचा गौरव
जिल्हा मुख्यालय निर्मितीनंतर मुख्यालयाच्या विकासासाठी दिशा देणाऱ्या व मोलाचे सहकार्य करणाऱ्या मुख्यालयातील पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुषपगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.