आनंद बाजारात विद्यार्थी शिकले व्यवहारज्ञान

आनंद बाजारात विद्यार्थी शिकले व्यवहारज्ञान

rat२४२३.txt

बातमी क्र. २३ (टुडे पान ३ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat२४p२४.jpg-
९१०९२
रत्नागिरी : आनंद बाजाराचे उद्घाटन करताना गणेश भिंगार्डे व डॉ. चंद्रशेखर केळकर. सोबत विनायक हातखंबकर, सतीश दळी, प्राजक्ता कदम, प्रमोदिनी शेट्ये आदी पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात आनंद बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी.
-
आनंद बाजारात विद्यार्थी शिकले व्यवहारज्ञान

आगाशे विद्यामंदिर ; खरेदीसाठी विद्यार्थी, पालकांची गर्दी

रत्नागिरी, ता. २४ : येथील भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी आज व्यापारी बनले. आनंद बाजारात अनेक प्रकारच्या शालोपयोगी वस्तू, घरगुती वस्तू, फळे, भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्री करून ते व्यवहारज्ञान शिकले. शाळेत प्रथमच आयोजित या बाजाराचे उद्गाटन रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे आणि शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर यांनी केले.
शाळेच्या पटांगणावर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत बाजाराचे आयोजन केले. या उपक्रमात जवळपास एक हजारांहून अधिक ग्राहकांनी अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. बाजाराच्या उद्घाटनाप्रसंगी भारत शिक्षण मंडळ सदस्य व उद्योजक अनंत आगाशे यांनी श्रीफळ वाढवले. शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह दादा वणजू, सतीश दळी, रत्नागिरी जिल्हा कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन फेडरेशनचे सचिव तुषार मलुष्टे, प्रबंधक विनायक हातखंबकर, चंद्रकांत घवाळी, संजय चव्हाण, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षिका भारती खेडेकर यांनी गुलाबपुष्प देऊन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशशेठ भिंगार्डे यांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. बाजारात विद्यार्थी खरेदीसाठी गेले तर त्यांना व्यवहारज्ञान कळणे आवश्यक असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना हे ज्ञान मिळेल. लागणारे सर्व सहकार्य व्यापारी महासंघ करेल, अशी ग्वाही भिंगार्डे यांनी दिली. तसेच शाळा समिती अध्यक्ष डॉ. केळकर यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. प्राजक्ता कदम यांन या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांसह व्यापारी बंधूंचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. सुधीर शिंदे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना, बेरीज-वजाबाकी व व्यवहारज्ञान सुलभपणे कळणे आवश्यक आहे. याकरिता प्रथमच तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना व्यापारी बनवले. पाच रुपयाला चणे, शेंगदाणे व वाटाणे विक्री करणारे बालव्यापारी ग्राहकांना बोलवत होते. तर भेळीच्या स्टॉलवर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. आगाशे शाळेसह पटवर्धन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीही या खरेदीचा आनंद लुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com