ड़ॉ. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ड़ॉ. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी
ड़ॉ. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी

ड़ॉ. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी

sakal_logo
By

डॉ. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा रविवारी
जिल्हा परिषदेचा उपक्रमः जिल्ह्यातील ५५७० विद्यार्थी प्रविष्ट
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा पॅटर्न ठरलेली ''भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा २०२२-२३'' रविवारी (ता. २६) तालुका परीक्षा केंद्रावर आयोजित केली आहे. या परीक्षेला चौथीमधून ३४५८ व सातवीमधून २११२ असे एकूण ५५७० विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे.
२६ ला सकाळी ११ ते १२.३० या वेळेत पहिला पेपर, तर दुपारी २ ते २.३० या वेळेत दुसरा पेपर घेण्यात येणार आहे. चौथीसाठी कणकवली-विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कुडाळ- कुडाळ हायस्कूल, सावंतवाडी-आरपीडी हायस्कूल, मालवण-अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, वैभववाडी-श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, वेंगुर्ले-आर. के. पाटकर हायस्कूल आणि उपकेंद्र मदर तेरेसा इंग्रजी माध्यम शाळा वेंगुर्ले, दोडामार्ग- दोडामार्ग इंग्लिश स्कूल, देवगड-शेठ म. ग. हायस्कूल, तर सातवीसाठी कणकवली-एस. एम. हायस्कूल, कुडाळ-कमशिप्र मंडळाची इंग्रजी माध्यम, सावंतवाडी-मिलाग्रीस हायस्कूल, मालवण-भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवण, वैभववाडी-श्री माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, वेंगुर्ले-वेंगुर्ले हायस्कूल, दोडामार्ग-साटेली भेडशी हायस्कूल, देवगड- श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे ही परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

चौकट
विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना परीक्षेचे हॉल तिकीट, शाळेचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत आणावे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात उपस्थित रहावे. परीक्षेला प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी त्या त्या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वेळीच उपस्थित राहतील, याची खबरदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी धोत्रे यांनी केले आहे.