रत्नागिरी- शिरगाव भात संशोधन केंद्रात बासमतीचे वाण विकसित

रत्नागिरी- शिरगाव भात संशोधन केंद्रात बासमतीचे वाण विकसित

- rat२४p१jpg-KOP23L91043 रत्नागिरी ः संशोधन केंद्रात तयार झालेल्या रत्नागिरी एम ६-५२ चे बासमती तांदूळ.
- rat२४p२jpg ः शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रातील बासमती वाणाचे शेती.
-----------
शिरगाव संशोधन केंद्रात बासमतीचे नवे वाण
रत्नागिरी एम ६-५२ ः उत्पन्नात वाढ, पाच ठिकाणी प्रयोग यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः शहराजवळील शिरगाव येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्रात ''रत्नागिरी एम ६-५२'' या बासमतीचे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी दिली.
रत्नागिरी एम ६-५२ हे बासमती वाण अजूनही टेस्टिंगमध्ये आहे. तांदूळ लांब व जाड आहे; मात्र स्थानिक व परजिल्ह्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या खरीप हंगामात देवगड, शिरगाव, गणेशगुळे, कोतवडे, कासारवेली या ठिकाणी या बासमती वाणावर प्रयोग करण्यात आले असून, ते यशस्वीही झाले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४५ ते ५० क्विंटलने वाढ झाली आहे. ७ मिलिमीटर लांबीचा तांदूळ असून हे पीक १२० दिवसात येते तसेच बासमतीसारखे सुवासिक आहे; मात्र या बासमतीसाठी जिल्ह्यात गिरण नसल्यामुळे त्यांचा तुकडा होईल. बासमती म्हणूनच याचा चांगला उपयोग होणार आहे. या नवीन वाणाचे दुसरे नाव लवकरच ठरवले जाणार आहे.
बासमतीसारखाच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणातील बासमती खायला मिळणार आहे. बासमतीचे उत्पादन परराज्यात होते. या तांदळाला असलेली मागणी, त्यातून वाढू शकणारे उत्पन्न विचारात घेता शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्रात याबाबत संशोधन सुरू होते. आता या हळव्या जातीचे वाण विकसित करण्यास संशोधन केंद्राला यश आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालगड, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी हे वाण दिले जाणार असून, खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांसाठी हे वाण बाजारात उपलब्ध होणार आहे.


चौकट.......
संशोधन केंद्रात १२ प्रकारच्या भात जाती
संशोधन केंद्राकडे १२ प्रकारच्या भात जाती उपलब्ध आहेत. त्यामध्ये रत्नागिरी-२४, रत्नागिरी-७३, रत्नागिरी-३, कर्जत-६, कर्जत-५, रत्नागिरी-६, ७,८ आणि समुद्रसपाटीचा भाग असलेल्या खाऱ्या जमिनींसाठी पनवेल १, २, ३ चा वापर केला जातो; मात्र अलीकडे कृषी संशोधन केंद्रातून लोकप्रिय शेतकऱ्यांच्या आवडीच्या रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४, रत्नागिरी ६ (लाल दाणे), रत्नागिरी-७, रत्नागिरी -८ (सुवर्णा) आदी जातींचा समावेश असल्याचे कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. विजय दळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com