राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉट ठरतोय टुरिझम डेस्टिनेशन

राजापूर-रानतळेतील पिकनिक स्पॉट ठरतोय टुरिझम डेस्टिनेशन

फोटो ओळी
-rat२४p१४.jpg ः KOP२३L९१०७१ राजापूर ः सुशोभीकरण करण्यात आलेले पिकनिकस्पॉटचे प्रवेशद्वार.
rat२४p१५.jpg ः KOP२३L९१०७२नारळाच्या करवंट्यांचा उपयोग करून तयार करण्यात आलेली कासवाची प्रतिकृती.
rat२४p१६.jpg ःKOP२३L९१०७३ टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून तयार करण्यात आलेली
(सर्व छायाचित्र ः संदेश जाधव, राजापूर)
--------

रानतळेतील पिकनिक स्पॉट ठरतोय टुरिझम डेस्टिनेशन

सुशोभीकरणाने नवा साज ; नगर पालिकेकडून आकर्षक रंगरंगोटी
राजापूर, ता. २४ ः नगर पालिकेच्यावतीने रानतळे येथे उभारण्यात आलेल्या ‘पिकनिक स्पॉट’चे सुशोभीकरण करण्यात आले असून त्यातून पिकनिक स्पॉटचे रूपडे पालटताना सौंदर्यांचा नवा साज मिळाला आहे. पिकनिक स्पॉटची करण्यात आलेली आकर्षक रंगरंगोटी आणि टाकाऊ वस्तूंचा खुबीने उपयोग करत निर्माण केलेल्या विविधांगी आकर्षक वस्तूंनी पिकनिक स्पॉटचे सौंदर्य आणि नजाकता अधिकच खुलले आहे. नियमित धकाधकीच्या जीवनामध्ये थोडा निवांतपणा, काहीसा विरंगुळा अन् कलात्मकता अनुभवण्याच्यादृष्टीने शहरवासियांसाठी रानतळे पिकनिक स्पॉट निश्‍चितच हक्काचे ‘टुरिझम डेस्टिनेशन’ बनले आहे.
तत्कालीन नगराध्यक्षा अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांच्या संकल्पना आण पुढाकारातून काही वर्षापूर्वी स्पॉटची निर्मिती करण्यात आली आहे. लोकवस्तीपासून काहीशी दूर असलेल्या उंच भाग असलेल्या रानतळे येथील पिकनिक स्पॉटचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये पिकनिक स्पॉटचे प्रवेशद्वार, बैठकव्यवस्थेसह परिसराची करण्यात आलेली आकर्षक रंगरंगोटी सार्‍यांचे आपसूकच लक्ष वेधून घेते. स्वच्छ आणि सुंदर परिसराला सुशोभिकरणाची साथ मिळालेल्या पिकनिक स्पॉटमध्ये बसून निवांतपणाची मिळणारी अनुभूती धकाधकीच्या जीवनातून आलेली मरगळ निश्‍चितच दूर करत नवी ऊर्जा देते. ही अनुभूती मिळवण्यासाठी आपसूकच सार्‍यांची पावले पिकनिक स्पॉटकडे वळताना दिसत आहेत.
--------------
चौकट
सौंदर्यामध्ये भर

पिकनिक स्पॉटचे सुशोभीकरण करताना मोटारसायकल आणि चारचाकी गाडीचे छोटे-मोठे टायर, मातीचे मडके, नारळाच्या करवंट्या आदी टाकाऊ वस्तूंचा खुबीने उपयोग करण्यात आला आहे. या वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तूची पिकनिक स्पॉटच्या ठिकाणी योग्य जागेचा शोध घेऊन त्या ठिकाणी केलेली मांडणी लक्षवेधी आहे. टाकाऊ वस्तूंना विविध आकार आणि आकर्षक दिलेली रंगसंगती पिकनिक स्पॉटच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालत आहे. टायरच्या साहाय्याने तयार केलेला बदक, नारळाच्या करवंट्यांचा उपयोग करत तयार केले कासव, मातीच्या मडक्यांना आकर्षक रंग देत त्यामध्ये लावलेली फुलझाडे यांनी पिकनिक स्पॉटचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या सुशोभीकरणामध्ये पालिकेचे अधिकारी-कर्मचार्‍यांसह शहरातील चित्रकारांनी ‘आपलं राजापूर’ म्हणून दिलेलं योगदानही कौतुकास्पद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com