
चेंदवण ग्रामपंचायतीतर्फे आवाहन
चेंदवण ग्रामपंचायतीतर्फे आवाहन
कणकवली ः चेंदवण (ता.कुडाळ) ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांची निविदा मागविण्यात आली आहे. नोंदणीकृत मक्तेदार यांच्याकडून शिलबंद लखोट्यात कामासाठी निविदा मागविण्यात येत आहेत. निविदा सादर करण्याची असेल तर सुटीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत २७ मार्चपर्यंत सकाळी दहापर्यंत निविदा बंद लखोट्यातून ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावयाची आहे. गावातील आंबेडकरनगर मुख्यनाला येथे गटार दुरुस्तीसाठी ७७ हजार ४४३ रूपये निधी मंजूर आहेत. आंबेडकरनगर मुख्यनाला गटार दुरुस्तीचे उर्वरित काम करणे ३९ हजार ३४८ रुपये तर बेलवाडी येथे स्मशान शेड दुरुस्तीसाठी १ लाख ५ हजार १३२ रुपयांचा निधी मंजूर आहे. कामाच्या निविदेबाबत अटी व शर्ती ग्रामपंचायत कार्यालयात पहावयास मिळतील, असे सरपंच ग्रामपंचायत चेंदवण यांनी कळवले आहे.
----
हेदुळ ग्रामपंचायतीची विकास निविदा
कणकवली ः हेदुळ (ता.मालवण) ग्रामपंचायतीतर्फे गावातील विविध कामांसाठी निविदा मागविण्यात आली आहे. यामध्ये हेदुळ मुख्य रस्ता ते गावडेवाडी उंचावळे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी ४ लाख ९९ हजार ९२५ रुपये निधी मंजूर आहे. हेदुळ बौद्धवाडी येथे रस्त्यालगत गटार बांधकाम करणे अनुसूचित जाती घटकांच्या दलीतवस्ती विकास निधीतून ८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मान्यता प्राप्त ठेकेदारांना ३१ मार्चपर्यंत ही निविदा सादर करावयाची आहे. कामाबाबत अटी व शर्ती ग्रामपंचायत कार्यालयात पाहावयास मिळतील, असे सरपंच ग्रामपंचायत हेदुळ यांनी जाहीर केले आहे.