
किंजळेतर्फे नातू येथील पूल वाहतुकीस खुला
किंजळेतर्फे नातू येथील पूल वाहतुकीस खुला
खेड, ता. २४ ः तालुक्यातील किंजळेतर्फे नातू येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे हा पूल वाहतुकीस खुला झाला आहे. जुना असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा पूल पावसाळा कालावधीमध्ये बाधित होऊन येथील ग्रामस्थांचा संपर्क तुटत होता.१७ ऑगस्ट २०२० या कालावधीमध्ये एका लहान मुलीला झालेल्या सर्पदंशाच्या कारणामुळे पुलावर पुराचे पाणी असल्याने त्या मुलीचा मृत्यू झाला होता. यानंतर जल फाउंडेशनच्यावतीने शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. अखेर या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या पुलाचे काम सुरू झाले होते. हे काम पूर्ण झाल्याने हा पूल खुला झाला आहे. या पावसाळा कालावधीमध्ये पुलावरून वाहतूक सुरळीत राहणार आहे.