शालेय विद्यार्थ्यांसाठी
उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

91149

शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

क्रीडा विभागाचा पुढाकार; खेळाचा प्रचार, प्रसारासाठी एप्रिलमध्ये आयोजन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागामार्फत ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी १७ एप्रिलपासून विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळाचा प्रचार व प्रसार यानुसार केवळ खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघांची संख्या वाढवणे, यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळनिहाय व शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुदृढता यामध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांचे आयोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. यासाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. सर्व खेळाडूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे. या शिबिरामध्ये मालवण येथे (जयगणेश इंग्लिश मीडियम) १७ ते २७ एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत मल्लखांब व बास्केटबॉल, जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे १७ ते २७ एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते दहा या वेळेत बॉक्सिंग प्रशिक्षण, जिमखाना स्टेडियम सावंतवाडी येथे १७ ते २७ दरम्यान दुपारी तीन ते सायंकाळी सहा दरम्यान कबड्डी, वराडकर हायस्कूल, कट्टा (ता. मालवण) येथे १७ ते २७ एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते दहा या वेळेत तसेच जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे सायंकाळी चार ते सात या वेळेत वेटलिफ्टींग, खेमराज विद्यालय सावंतवाडी येथे १७ ते २७ एप्रिल दरम्यान सकाळी आठ ते दहा या वेळेत कॅरम पंचम, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत बुद्धिबळचे ऑनलाईन प्रशिक्षण, सावंतवाडी उपरकर शुटींग रेंज येथे १७ ते २१ एप्रिल दरम्यान रायफल शूटिंग प्रशिक्षण सकाळी आठ ते दहा या वेळेत, तर शूटिंग रेंज वेंगुर्ले येथे २२ ते २७ एप्रिल सायंकाळी चार ते सहा या वेळेत दिले जाणार आहे, अशी माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com