तीन वर्षांनी वागदे येथे डांबरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन वर्षांनी वागदे येथे डांबरीकरण
तीन वर्षांनी वागदे येथे डांबरीकरण

तीन वर्षांनी वागदे येथे डांबरीकरण

sakal_logo
By

91143
वागदे : येथील महामार्गावरील अपूर्ण मार्गिकेच्या डांबरीकरणाचे काम आजपासून सुरू करण्यात आले.


तीन वर्षांनी वागदे येथे डांबरीकरण

ठेकेदाराकडून दखल; धुळीचा त्रास थांबणार असल्याने समाधान

कणकवली, ता.२४ : मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे येथील अपूर्ण स्थितीत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाले आहे. तीन वर्षानंतर महामार्ग आणि ठेकेदाराकडून यांच्याकडून हे काम होत असल्‍याने वाहन चालकांतून समाधान व्यक्‍त झाले.
येथील खड्डेमय रस्त्यामुळे महामार्गावरील वाहन चालकांना धुळीचा तसेच खड्डयांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. महामार्गावरून सुसाट वेगाने येणारी वाहने येथे आदळून अपघातग्रस्त होत होती. आज सकाळी अकरापासून येथील अपूर्ण मार्गिकेचे काम सुरू केले आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्णत्‍वास जाण्याची शक्‍यता महामार्ग ठेकेदाराने व्यक्‍त केली.
वागदे येथील काही ग्रामस्थांना महामार्ग विभागाकडून भू संपादनाचा मोबदला मिळाला नव्हता. त्‍यामुळे येथील काम स्थानिकांनी रोखले होते. तर ठेकेदारानेही गोवा ते मुंबई या दिशेने जाणारी दीडशे मिटर लांबीच्या मार्गिकेचे काम शिल्‍लक ठेवून उर्वरीत काम पूर्ण केले होते.
वागदे उभादेव मंदिर समोरील दीडशे मिटर लांबीचे काम अपूर्ण स्थितीत असल्‍याने वागदे गोपुरी आश्रम ते गडनदी पुल या अंतरापर्यंत एकाच मार्गिकेवरून वाहने ये-जा करत होती. त्‍यामुळे येथे सातत्‍याने अपघात होत होते. तीन वर्षांत तब्‍बल चौदा जणांना या अपघातामध्ये प्राण गमवावे लागले. त्‍यामुळे संतापलेल्‍या कणकवलीवासीयांनी गतवर्षी याठिकाणी रास्त रोको आंदोलन केले होते. अखेर महिनाभरात येथील स्थानिकांना जमिनीचा संपादन मोबदला देण्याची ग्‍वाही दिली होती. तसेच महिन्याभरात मोबदला देण्याची कार्यवाहीही पूर्ण करण्यात आली; मात्र गेले वर्षभर अपूर्ण मार्गिकेचे काम पूर्ण केले नव्हते.
--
आमदार नीतेश राणेंचा पाठपरावा
आज महामार्ग ठेकेदार विभागाकडून येथील अपूर्ण मार्गिकेच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. यावेळी वागदे सरपंच संदीप सावंत व इतर ग्रामस्थही उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांनी महामार्ग विभागाकडे सतत पाठपुरावा ठेवला होता. त्‍यामुळे हे काम पावसाआधी मार्गी लागले असल्‍याची माहिती वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिली.