रस्ताकाम रोखा, अन्यथा आंदोलन

रस्ताकाम रोखा, अन्यथा आंदोलन

९११४८
मळगाव ः येथील रस्ताकामाची पाहणी करताना राजू परब व ग्रामस्थ.

रस्ताकाम रोखा, अन्यथा आंदोलन

मळगाववासीयांचा इशारा; निकृष्ट काम होत असल्याची खंत

सावंतवाडी, ता. २४ ः मळगाव-कुभांरवाडीतील गॅस कंपनीकडून सुरू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ते योग्य प्रकारे न केल्यास रोखण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती राजू परब यांनी दिला. या कामाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असून या पार्श्वभूमीवर परब यांनी उपसरपंच हनुमंत पेडणेकर व अन्य ग्रामस्थांना घेऊन कामाची पाहणी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनुजा खडपकर, प्रेमनाथ राऊळ, एकनाथ खडपकर, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, दीपक जोशी, दत्तप्रसाद नाईक, सूरज राऊळ, भाऊ कवटकर, नंदू केरकर, प्रकाश वराडकर व कुभांरवाडीतील सर्व महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com