संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान 5 साठी, संक्षिप्त

भाजपच्या खेड तालुका कार्यालयाचे उद्‍घाटन
खे़ड ः तालुका भाजपच्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तालुका कार्यालयाचे उद्‍घाटन भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष केदार साठे यांच्या हस्ते झाले. राज्यात आणि केंद्रात सरकार असूनही तालुक्याच्या ठिकाणी आपल्या पक्षाचे कार्यालय नाही याची खंत कार्यकर्त्यांना वाटत होती; मात्र आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय झाल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गैरसोय दूर झाली आहे. कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना साठे यांनी सांगितले, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय तसेच पोलिस ठाण्यासमोर असलेल्या या कार्यालयामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय दूर होणार आहे. पक्षाच्या येणाऱ्या विविध योजना या निमित्ताने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदतच होणार आहे. या वेळी ज्येष्ठ नेते आबा जोशी, राजूभाई रेडीज, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, महिला आघाडी तालुका संघटक संजीवनी शेलार, गोपीनाथ पवार, सोपान गुहागरकर, संतोष दोडेकर, बुथ अध्यक्ष परवेज सहिबोले, कार्यकर्ता रिहान वालपकर, सऊद रावल, नादिल परकर, अख्तर मापकर व अल्पसंख्य मोर्चा खेड तालुकाध्यक्ष मोअजम भाई जसनाईक उपस्थित होते.

91069
बुटालांचा घेरा पालगड ट्रस्टकडून सत्कार
खेड ः धामणी येथील व खेड येथे गेली अनेक वर्षे खेड तहसील कार्यालयात बॉन्ड रायटर म्हणून कार्यरत असलेले उमेश अनंत बुटाला यांचे धामणी घेरा पालगड ट्रस्ट मुंबईच्या वतीने नुकतेच दादर मुंबई येथे सत्कार केला. खेड तालुक्यातील गरजूंना ग्रामस्थांना बक्षीसपत्र व इतर शासकीय अडचणी येत असताना बुटाला ग्रामस्थांना मदत करत आहेत. कामाची दखल घेऊन धामणीघेरा पालगड ट्रस्ट मुंबई यांनी दादर या ठिकाणी आणि धामणी गावात सत्कार केला. उमेश बुटाला यांची शासनाने सलग तीन वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याचे औचित्य साधून दशानेमा मुरली मनोहर मंडळाचे पदाधिकारी घरी जाऊन त्याचे कौतुक करून त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

रोटरी स्कूलमध्ये अभिनय कार्यशाळा
खेड ः भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अभिनय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते रघुनाथ कासेकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेविषयी ओळख करून देत मार्गदर्शन केले. कलाकारांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही केले. सिनेदिग्दर्शक व संगीतकार श्रीराम पवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अंगी कला का असावी, याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी, संस्थेचे अध्यक्ष बिपिन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, समन्वयक राहुल गाडबैल, प्राथमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूजा बुटाला, कार्यशाळा प्रकल्पप्रमुख मीनाक्षी निवाते आदी उपस्थित होते.

महिलांनी सक्षम बनण्याची गरज ः आवटी
खेड ः आधुनिक युगात महिलांनी स्वत:पासूनच बदल करायला हवा. पुढची पिढी कशी घडवायची हे महिलांच्याच हातात असून महिलांनी स्वतः सक्षम बनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अनिता आवटी यांनी केले. भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयात महिला विकास कक्ष समाजशास्त्र विभाग व आयक्युएससी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना जिद्दीने करावा. जगण्यासाठीच नव्हे तर पृथ्वीतळावर जन्म घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. स्त्रीशक्तीचा पुरेपूर वापर करून एक आदर्श महिला बनून दाखवण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणत्याही क्षेत्रात चांगला ठसा उमटवून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहनही केले.