नारायण तलावास मिळणार झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारायण तलावास मिळणार झळाळी
नारायण तलावास मिळणार झळाळी

नारायण तलावास मिळणार झळाळी

sakal_logo
By

- rat२४p३०.jpg ः
९११५२
चिपळूण ः शहरातील नारायण तलावाचे गतीने सुरू असलेले सुशोभिकरणाचे कामकाज.
-
नारायण तलावास मिळणार झळाळी

साडेतीन कोटीचा खर्च ; गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक

चिपळूण, ता. २४ ः शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन काळातील नारायण तलावाचे संवर्धन, नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम आता प्रगतीपथावर आले आहे. पुढील महिनाभरात तलावाच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण होऊन गार्डन आणि वॉकिंग ट्रॅकचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून सुशोभित होणारे हे तलाव आणि परिसर चिपळूण शहरात मॉडेल ठरणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला लागूनच चिपळूण शहरातील प्रभातरोड परिसरात पुरातन काळातील नारायण तलाव आहे. काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले. सतत येणाऱ्या पुरामुळे तलावात माती, चिखल, कचरा जमा झाला आणि नारायण तलावाचे अस्तित्वच जणू संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली; परंतु येथील स्थानिक नागरिकांनी सातत्याने तलावाचे संवर्धन व सुशोभिकरणाची मागणी लावून धरली आणि त्यांना यशदेखील आले. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नारायण तलावाच्या सुरवातीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या तलावाच्या कामाला सुरवात झाली. त्यानंतर खासदार विनायक राऊत तसेच आमदार शेखर निकम यांनी देखील निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे कामाला चालना मिळाली व प्रत्यक्षात वेगाने काम सुरू देखील झाले.
तीन टप्प्यात हे काम होणार आहे. तलावाचे संवर्धन करताना मूळ ढाचा तसाच ठेवून येथील नैसर्गिक स्रोतदेखील अबाधित ठेवण्यात येणार आहे तसेच तलावाच्या मध्यभागी असलेले नैसर्गिक बेट तसेच ठेवून त्याला सुशोभित करताना पशुपक्ष्यांचादेखील विचार करण्यात आला आहे. या बेटावर कोणालाही जाता येणार नाही, अशी रचना करण्यात आली आहे. त्यामुळे चोहोबाजूने पाणी आणि मध्यभागी सुशोभित बेट तलावाचे सौंदर्य वाढवणारे ठरणार आहे. तलावाला दगडी भिंतीचे स्वरक्षण देण्यात येणार असून, त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पुढील महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील कामाला सुरवात होणार आहे. तलावाच्या सभोवार वॉकिंग ट्रॅकसाठी पेव्हरब्लॉक तसेच दोन्ही बाजूने गार्डन सुशोभित करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी बैठकव्यवस्था, सांजकट्टा व स्वच्छतागृह अशा सुविधादेखील येथे असणार आहे. पावसाळ्यानंतर तलावाच्या कामाचा अंतिम टप्पा हाती घेण्यात येणार आहे. तलावाला नैसर्गिक पाण्याचे झरे असल्याने वर्षाचे बारा महिने येथे पाणी राहते. साहजिकच अत्याधुनिक पद्धतीने सुशोभिकरण झाल्यानंतर पाण्याने भरलेले तलाव आणि नैसर्गिक बेट त्यावर पशुपक्ष्यांचा वावर यामुळे चिपळूण शहरात नारायण तलाव ''मॉडेल'' ठरणार आहे. चिपळूण पालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कामे केली जात आहेत.