मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीतर्फे माझे मत लेखन स्पर्धा

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीतर्फे माझे मत लेखन स्पर्धा

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृतीतर्फे
माझे मत लेखन स्पर्धा


चिपळूण, ता. २५ ः तालुक्यातील खेरशेत येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिल्हास्तरीय विधवा प्रथा बंद माझे मत लेखन स्पर्धा- २०२३ आणि दैनिक वृत्तपत्र, बातमी, माहिती लेखन स्पर्धा- २०२३ आयोजित करण्यात आल्या आहेत.
विधवा प्रथा बंद या आदेशाविषयी माझे मत हा या स्पर्धेतील महत्वाचा विषय आहे. स्पर्धकांनी आपले साहित्य संघराज कदम, ३०३, अजय रेसिडेन्सी, साकेत अपार्टमेंट, भूमी अभिलेख कार्यालयाजवळ, पागझरी रोड, चिपळूण, जि. रत्नागिरी येथे पाठवणे. स्पर्धेतील निवड झालेल्या दहा विजेत्या स्पर्धकांना लेखणी सन्मान, पदक आणि सन्मानपत्र- २०२३ व सहभागी स्पर्धकांना क्रांतिज्योती लेखणी सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पत्रकार, वृत्तपत्रलेखक यांच्या विधवा प्रथा बंदविषयक दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक, पाक्षिक, मासिकांमध्ये प्रसिद्ध झालेली अभ्यासपूर्वक बातमी, माहिती, लेख यांना परीक्षकांद्वारे निवड झालेल्या विजेत्यांना युगनायिका सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती लेखणी पदक व सन्मानपत्र- २०२३ द्वारे सन्मानित करण्यात येईल. याकरिता प्रसिद्ध बातमी, लेखनाचे कात्रण ३० एप्रिलपूर्वी पाठवावे. या स्पर्धा यशस्वी करण्याकरिता रत्नागिरी जिल्हावासियांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com