आवडीचे व कर्तृत्व केंद्रिय करिअर करा

आवडीचे व कर्तृत्व केंद्रिय करिअर करा

-rat२४p३१.jpg-
९११५३
रत्नागिरी ः करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी प्रा. विजय नवले यांचा सत्कार करताना संस्थेचे प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई. डावीकडून स्वप्नील सावंत, स्नेहा कोतवडेकर, अक्षता तेंडुलकर.
-
बीसीए, नर्सिंग, फॅशन डिझायनिंगमध्ये संधी

प्रा. विजय नवले ; कर्वे संस्थेतर्फे करिअर मार्गदर्शन

रत्नागिरी, ता. २४ ः सर्वच क्षेत्रात करिअर संधी आहेत; परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे करिअर करावे. सध्या बीसीए, नर्सिंग आणि फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात सर्वाधिक करिअरच्या संधी आहेत. स्वतःची क्षमता, पात्रता पाहून आणि देशासाठी काय करू शकतो ही भावना ठेवावी. पैसाकेंद्रित करिअर नको तर कर्तृत्वकेंद्रित करिअर करा, असा मोलाचा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी दिला.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव प्रकल्पातर्फे शुक्रवारी मराठा भवन मंगल कार्यालयात व्याख्यान बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थी, पालकांसाठी आयोजित केले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. प्रा. नवले यांचा सत्कार प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई यांनी केला. कार्यक्रमात महर्षी कर्वे संस्थेच्या बीसीए कॉलेजच्या प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या अक्षता तेंडुलकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश सोहनी, सीए आनंद पंडित आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com