''आनंदाचा शिधा''च्या धान्यात तफावत

''आनंदाचा शिधा''च्या धान्यात तफावत

swt2419.jpg
91164
सावंतवाडी : तहसीलदार अरुण उंडे यांच्याशी चर्चा करताना सुरेश भोगटे. सोबत विलास जाधव, उमाकांत वारंग आदी.

‘आनंदाचा शिधा’च्या धान्यात तफावत
माजी नगरसेवकांचा आरोपः तहसीलदारांकडे कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी ता. २४ः ‘आनंदाचा शिधा’ धान्य पुरवठाधारकाकडून तालुक्याला पाठवलेल्या धान्याच्या वजनात मोठी तफावत आढळून आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत माजी नगरसेवकांनी आज सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांचे लक्ष वेधले. संबंधित पुरवठाधारकावर कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा उपोषण छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शिंदे-फडणवीस सरकारकडून गरिबांसाठी रेशन धान्य दुकानावर ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध करून दिला आहे. हा आनंदाचा शिधा तालुक्याला प्राप्त झाला होता. येथील पुरवठा विभागाच्या गोदामामध्ये संबंधित पुरवठाधारकाने हा शिधा ट्रकमधून पाठवला; परंतु साखर, तूरडाळ व अन्य धान्याच्या वजनामध्ये मोठी तफावत आढळून आली. येथील गोदामाच्या मापारीकडून संबंधित धान्याचे वजन केले असता त्यामध्ये मोठी तफावत दिसून आली. प्रत्येक धान्याच्या एकूण वजनामध्ये असलेली तफावत संबंधित मापारी व गोदामाच्या अधिकाऱ्याकडून तहसीलदार यांच्या कानावर घालण्यात आली. त्यानंतर संबंधित धान्य ताब्यात न घेता परत पाठविण्यात आले. हा प्रकार माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या लक्षात येताच त्यांनी आज यासंदर्भात तहसीलदार उंडे यांची भेट घेत चर्चा केली.
यावेळी तहसीलदार उंडे यांनी धान्याचा ट्रक परत पाठवला असल्याचे स्पष्ट केले. आम्ही आलेला माल वजन करूनच ताब्यात घेतो. त्यामुळे तक्रार करण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले; मात्र पुरवठाधारकाने वजनामध्ये घडवून आणलेली तफावत हा प्रकार चुकीचा असून संबंधित पुरवठाधारकावर कारवाई झालीच पाहिजे. त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे गरजेचे असून यासंदर्भात आम्ही आवाज उठवणार आहोत. जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही. वेळप्रसंगी उपोषणही छेडू, असे भोगटे यांनी सांगितले. यावेळी उमाकांत वारंग, विलास जाधव आदी माजी नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com