
रेटीनातज्ज्ञ डॉ. कामत करणार तपासणी
इन्फिगो आय केयरमध्ये रविवापासून
डोळ्याच्या पडद्याची तपासणी
रत्नागिरी, ता. २४ : कोकणात कुठेही डोळ्यांच्या पडद्याच्या (रेटिना) आजारावर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे रेटिनातज्ज्ञ डॉक्टर येऊन तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया करत असल्याने हजारो रुग्णांना फायदा झाला आहे. विशेषतः डायबेटिस असलेल्या रुग्णांनी वर्षातून दोन वेळा डोळ्याच्या पडद्याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याकरिता व शस्त्रक्रियांसाठी इन्फिगोचे रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत हे येत्या रविवारपासून (ता. २६) रत्नागिरीत येणार आहेत. २८ मार्चपर्यंत ते इन्फिगोमध्ये दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत रुग्ण तपासणी करणार आहेत.
भारतात सर्वाधिक डायबेटीस असलेल्या व्यक्ती असल्याचा वैद्यकीय अहवाल सांगतो. प्रत्येक १०० भारतीयांमध्ये सरासरी १६ ते १८ व्यक्तींना डायबेटीस आढळतो. डायबेटिसमुळे मेंदू, डोळ्यांचा पडदा, किडनी व हृदय या महत्वाच्या अवयवांवर दुष्परिणाम होतो. हे दुष्परिणाम कायमस्वरूपी असतात व विशेषतः डोळयाच्या पडद्यावर रक्तस्त्राव होणे, पडद्याला सूज येणे, क्वचितप्रसंगी पडदा सरकणे किंवा छिद्र पडणे अशी गुंतागुंत मधुमेही व्यक्तींमध्ये आढळून येते. यामुळे हळूहळू दृष्टीनाश घडून येतो व वेळीच रेटीना तज्ज्ञांकडून वार्षिक तपासणी न करून घेतल्याने या आजारांचे उशिरा निदान होते व गेलेली दृष्टी पूर्णतः परत मिळण्याची शक्यता कमी होत जाते. प्रगत अवस्थेत निदान व उपचार सुरु केल्यास वेळ व पैसे खर्च झाल्याने निराशा येते.
शंकर नेत्रालय चेन्नई येथून विशेष उच्च प्रशिक्षित रेटीनातज्ज्ञ डॉ. कामत हे इन्फिगो हॉस्पिटलमध्ये डोळ्याच्या पडद्याच्या आजारावर निदान, उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. विशेष शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. या तपासणीसाठी येताना थोडा वेळ लागत असल्याने सोबत एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत. रुग्णालयात पूर्वनोंदणी करून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-
अवघड शस्त्रक्रिया रत्नागिरीत
इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी, त्यातील काहींची शस्त्रक्रिया करण्यात आली. इन्फिगो आय केयरमध्ये रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असा अत्याधुनिक रेटीना विभाग आहे. डॉ. प्रसाद कामत रेटिनाच्या अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रकिया रत्नागिरी येथे करणार आहेत. इन्फिगोचा रेटीना विभाग बी स्कॅन, ग्रीन लेझर, थ्रीडी ओसीटी व अत्याधुनिक अर्टली विटरेक्टॉमी मशीन अशा यंत्रणांनी सुसज्ज असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांनी दिली.