हर घर जल व हागणदारीमुक्त गावे जाहिर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर घर जल व हागणदारीमुक्त गावे जाहिर करा
हर घर जल व हागणदारीमुक्त गावे जाहिर करा

हर घर जल व हागणदारीमुक्त गावे जाहिर करा

sakal_logo
By

हर घर जल व हागणदारीमुक्त गावे जाहीर करा

ग्रामविकासचे आदेश ः ३१ मार्चपर्यंतची डेडलाईन

रत्नागिरी, ता. २४ ः ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम’ पूर्ण झाले आहे, ते गाव हर घर जल घोषित म्हणून घोषित करावे, अशा सूचना ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला देण्यात आले आहेत. तसेच हागणदारीमुक्त अधिक योजनेंतर्गत निकषांची पूर्तता करणाऱ्‍या गावांचीही नावे घोषित करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
जल दिनाचे औचित्य साधून राज्यातील परिस्थितीचा आढावा अधिकाऱ्यांनी घेतला. ऑनलाईन झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) हे सहभागी झाले होते. केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांना हर घर जल गाव व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जलजीवन मिशनच्या निकषानुसार गावातील कार्यात्मक घरगुती नळजोडणी, शाळा, अंगणवाडी, मिशन या सार्वजनिक संस्थांना नळजोडणी पूर्ण केलेल्या व नळजोडणीद्वारे नियमित पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्‍या गावांना हर घर जल म्हणून घोषित करण्यात येते. तसेच हागणदारीमुक्त अधिक गाव अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषांची पूर्तता केल्यास गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येते. जलदिनाच्या अनुषंगाने निकष पूर्ण करत असलेल्या गावांना हर घर जल हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून गाव घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत ही नावे घोषित होणे अपेक्षित आहे.