
फोटोसंक्षिप्त-साळगावात प्रकटदिनी गुरांना हिरवा चारा
९११७६
साळगावात गुरांना हिरवा चारा
कुडाळ ः साळगाव येथील वेदपाठशाळेत श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त गुराना (गायीना व वासरांना) हिरवा चारा देण्यात आला. बारा वासरांसाठी झारापचे आदर्श शेतकरी शरद धुरी यांनी मक्याचा चारा कापून दिला. याचप्रमाणे वेदपाठशाळेत शिकणाऱ्या ब्राह्मणांना गुळ, बटाटे, नारळ, खोबरे, तुरडाळ असा शिधा देण्यात आला. कोणाला आपले वाढदिवस साजरे करायचे असतील, तर त्यांनी मुक्या जनावरांना चारा व खाऊच्या स्वरूपात वस्तू देव्यात, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांनी केले आहे. स्वामी प्रकटदिनी भटजी अक्षय पत्की, गिरीश मुंडले, विराज मुंडले, राजू तेंडोलकर उपस्थित होते.
--
पानवळ-बांदा येथे गुरुवारी रामनवमी
बांदा ः प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम पंचायतन मंदिर, पानवळ-बांदा येथे ३० मार्चला रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी नऊला नित्यपूजन आणि अभिषेक, दहाला सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी बाराला श्री रामजन्म सोहळा, त्यानंतर महाप्रसाद, दुपारी दोन ते तीन दरम्यान भक्तिसंगीत (प्रदीप चिटणीस, मुंबई), साडेतीन ते पाचपर्यंत प. पू. भक्तराज महाराज भजन मंडळ, पर्वरी यांचे भजन, सायंकाळी पाच ते साडेपाच श्रीरामरक्षा आवर्तन, श्रीराम जप (सामूहिक), सायंकाळी सहाला शेखर पणशीकर यांचे ‘गीतरामायण’, रात्री आठला स्थानिकांचे भजन होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. दास (रघुवीर) महाराज यांनी केले आहे.