रामनवमी महोत्सवाने
कुडाळनगरी भक्तिमय

रामनवमी महोत्सवाने कुडाळनगरी भक्तिमय

पेस्टेड फोटो
91133

रामनवमी महोत्सवाने
कुडाळनगरी भक्तिमय
कुडाळ, ता. २४ ः श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथील रामनवमी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाले. यावेळी श्री देव कुडाळेश्वर महाराजांची श्री दत्त अवतारात साकारलेली विलोभनीय पूजा लक्षवेधी ठरली.
येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे श्रीरामनवमी महोत्सव २२ मार्च ते १ एप्रिल या ११ दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काल (ता. २३) श्रींच्या पाषाणमूर्तीवर लघुरुद्र अभिषेक, नवोदित बालदशावतार नाट्यमंडळ, माड्याचीवाडी यांचे पौराणिक नाटक ‘वीरासुर वध’, आरती, मंत्रघोष पुराण वाचन, श्रींची पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण, गायक, वादक उपस्थित होते. रात्री दहाला सभागृहात कीर्तन श्रवणासाठी श्रींच्या उत्सव मूर्तीचे आगमन झाले. त्यानंतर कीर्तन व आरती झाली. महोत्सवाच्या चौथ्या दिवशी उद्या (ता. २५) सायंकाळी साडेचारला अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा विठ्ठल भक्तीवर आधारीत ‘कुर्मदासाची वारी’ नाट्यप्रयोग होणार आहे. श्री देव कुडाळेश्वर महाराजांची दत्त दर्शन अवतारातील विलोभनीय सजावट महेश राऊळ यांनी साकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com