दाभोळ-चंद्रनगर वळणावर एसटी चालकाला मारहाण

दाभोळ-चंद्रनगर वळणावर एसटी चालकाला मारहाण

चंद्रनगर वळणावर
एसटी चालकाला मारहाण
दाभोळ, ता. २४ ः दापोली बुरोंडी मार्गावरील चंद्रनगर येथील वळणावर एसटी बसचालकाला तीन अज्ञातांनी क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. अज्ञातांविरुद्ध दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी चालक सूर्यकांत वाडकर हे दापोली बसस्थानकातून दापोली करजगाव ही बस घेऊन निघाले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची बस समाली हॉटेलच्या पुढे चंद्रनगर वळणावर आली असता समोरून (बुरोंडी बाजूकडून) आलेल्या मोटारीने (एमएच-०१-एमए-८३३१) बस पास केली. त्यानंतर या चारचाकीमधील प्रवासी चारचाकीमधून खाली उतरले व त्यांनी बस थांबवून बसचालक वाडकर यांना शिवीगाळ केली. तेव्हा वाडकरही बसमधून खाली उतरून शिवीगाळ का करता, अशी विचारणा करत असताना या चारचाकीमधील अज्ञात लोकांनी वाडकर यांना ढकलले. यात वाडकर यांना एसटीचा दरवाजा कमरेला मार लागला. दुसऱ्या व्यक्तीने वाडकर यांचा शर्ट पकडून खिसा फाडला तर तिसऱ्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराचे वाहक नीलेश शिरसाट हे त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना त्यातील एकाने शिरसाट यांचा मोबाईल हिसकावून घेतला व जमिनीवर आपटून मोबाईलचे नुकसान केले. या प्रकरणी चालक सूर्यकांत वाडकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल अजित गुजर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com