रत्नागिरी ः लांजात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः लांजात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी ः लांजात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी ः लांजात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat२४p२९.jpg- KOP२३L९११४६ लांजा ः शेतकऱ्याने शेतीपंपाच्या जोडणीमध्ये फेरफार करून ही वीज चोरी केली.
------------

लांजात वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी, ता. २४ ः लांजा तालुक्यातील झापडे येथे शेतकऱ्याकडून वीजचोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शेतीपंपासाठीच्या विद्युत मीटरच्या मांडणीत फेरफार करून १ लाख ४१ हजाराची ही वीज चोरी केली. या प्रकरणी संशय़िताविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांताराम भगवान इंदुलकर (रा. झापडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांच्याविरुद्ध महावितरणने गुन्हा दाखल केला आहे. या वीज चोरीप्रकरणी ६ हजार ७२० युनिटची आर्थिक मुल्याप्रमाणे १ लाख ४१ हजार रुपयांचे वीजवापर व दंडाचे देयक आकारण्यात आले आहे. शांताराम भगवान इंदुलकर यांच्या शेतात १९ जानेवारी २०२३ ला पंचासमक्ष स्थळपाहणी केली. तेव्हा विद्युत मीटरच्या मांडणीत फेरफार करून वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. ग्राहकास दंडाचे वीजबिल दिले. ते विहित मुदतीत भरले नसल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या लांजा -१ शाखा कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता मनाली माळी, मुख्य तंत्रज्ञ अनिल चौधरी, वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन नागले, अनिल साबळे यांनी ही कारवाई केली.