माणगाव वाचनालयात 
बक्षीस वितरण उत्साहात

माणगाव वाचनालयात बक्षीस वितरण उत्साहात

91190
माणगाव ः यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत वाचनालयाचे सर्व संचालक व मान्यवर.

माणगाव वाचनालयात बक्षीस वितरण
माणगाव, ता. २४ ः येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील ८० यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला कुडाळ जिल्हा परिषद बांधकाम अभियंता विनायक चव्हाण व सावंतवाडी बांधकाम अभियंता विजय चव्हाण उपस्थित होते.
यावेळी माणगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच मनीषा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात माणगावचे नाव परदेशात पोहचविणारे व अनेक खेळाडू तयार करण्याचा ध्यास घेतलेले भिवा म्हाडेश्वर, कबड्डीत माणगावचे नाव राज्य पातळीवर नेणारा बालखेळाडू उन्मेश सावंत यांचाही सत्कार केला. सरपंच भोसले यांनी मुलांना मार्गदर्शन करताना जेवढे उपक्रम एखाद्या शाळेत मुलांसाठी उपक्रम राबविले जातात, त्यापेक्षा जास्त उपक्रम वाचनालय राबवते. या वाचनालयास ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी संचालक दादा कोरगावकर, शाम पावसकर, विजय पालकर, स्नेहा माणगावकर, वि. न. आकेरकर, कॅ. बबनराव खोचरे, ग्रंथपाल प्रज्ञा कविटकर, सहग्रंथपाल अजित आर्डेकर आदी उपस्थित होते. उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव एकनाथ केसरकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष परशुराम चव्हाण यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com