जयश्री गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

जयश्री गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

- rat२४p३९.jpg-
९१२२२
रत्नागिरी ः खो-खो स्पर्धेचे उद्घाटन करताना अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड. सोबत जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, बाळू साळवी, विनोद मयेकर, किरण सनगरे, सैफन चरके आदी.

महिलांच्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

रत्नागिरी ः राज्य शासनाने ८ ते २५ मार्च या कालावधीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय व युवक क्रीडा संचालनालय आयोजित महिलांच्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी व राजापूरमधील नऊ संघांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी अपर पोलिस अधिक्षक गायकवाड यांनी खेळाडूंना शुभेच्छ देताना चांगला खेळ करा असे सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, विनोद मयेकर, किरण सनगरे, सैफन चरके, राष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक पंकज चवंडे, राष्ट्रीय खेळाडू पूनम भरणकर, क्रीडाधिकारी विशाल बोडके यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com