आंबोली घाटातील अवजड 
वाहतूक तत्काळ थांबवा

आंबोली घाटातील अवजड वाहतूक तत्काळ थांबवा

आंबोली घाटातील अवजड
वाहतूक तीतडीने थांबवा

जयंत बरेगार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी, ता. २४ ः आंबोली घाटात अवजड वाहतुकीस बंदी असताना याची अंमलबजावणी केवळ दिवसाउजेडी होते; मात्र रात्री बारानंतर घाटाच्या खालून व घाटावरून अवजड वाहने संगनमत व तडजोड करून सोडली जातात, असा आरोप करीत याकडे लक्ष गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
बरेगार यांनी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना आंबोली घाटासंदर्भात निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, धोकादायक झालेला आंबोली घाट लक्षात घेता तेथील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून तसे आदेशही देण्यात आले; परंतु याबाबत अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अवजड वाहतुकीसंदर्भात या मार्गावर वाहतूक पोलिस तैनात असतात. आंबोली पोलिस दूरक्षेत्रामार्फतही अंमलबजावणी केली जाते; परंतु केवळ दिवसा ही अंमलबजावणी होते. रात्री बारानंतर या ठिकाणी घाटाच्या खालून व वरून जाणारी अवजड वाहतूक तडजोड व संगनमताने सुरू असते. त्यामुळे धोकादायक स्थितीत असलेला आंबोली घाट अजून धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे. घाटातून होणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाणे तसेच पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना द्यावेत. अवजड वाहतुकीमध्ये येणारे वन, महसूल विभाग यांनाही वाहतूक परवाने देताना घाटातून वाहतुकीस बंदी करण्याच्या सूचना द्याव्यात. या संदर्भात तत्काळ कार्यवाही न झाल्याल दर महिन्याला आंबोली पोलिस ठाण्याचे कोणत्याही आठ दिवसांचे रात्री ११ ते सकाळी ५.३० वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकारात मागविणार असल्याचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com