टस्कराच्या वावरामुळे 
केरवासीयांमध्ये दहशत

टस्कराच्या वावरामुळे केरवासीयांमध्ये दहशत

91256
केर ः येथे दाखल झालेला टस्कर व पिल्लू.

टस्कराच्या वावरामुळे
केरवासीयांमध्ये दहशत

दोडामार्ग, ता. २४ ः केरमध्ये टस्कराचा दिवसाढवळ्या वस्तीशेजारी वावर असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. त्यातच काल (ता. २३) आणि आजही मादी व पिल्लाच्या दर्शनाने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
तालुक्यात सध्या काजूचा हंगाम जोरावर आहे. त्यातच तिलारी खोऱ्यात दाखल झालेल्या टस्कर व पिल्लाने केर व मोर्ले गावात त्यांचे बस्तान मांडले आहे. त्यांचा वावर कधी केर, तर कधी मोर्ले गावात असतो. काजूच्या हंगामामुळे शेतकरी काजू बागेत जास्त प्रमाणात वावरत आहेत. त्यातच टस्कर व पिल्लाचे आगमन झाल्याने तेथील शेतकरी चिंतातूर झाला आहे. आज हे दोन्ही हत्ती केर येथील लोकवस्तीपासून काही अंतरावर दिसून आले. सायंकाळी गुरांना आणण्यासाठी गेलेल्या शेतकरी ग्रामस्थांना या हत्तींची चाहूल लागतात त्यांनी इतर ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत हत्तींना हुसकावण्याचा प्रयत्न केला. यातील काहींनी त्यांची छबी मोबाईलमध्ये कैद केली. काजू हंगामात हत्ती लोकवस्ती व बागेजवळ येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्तींमुळे शेतकऱ्यांना शेतात व काजू बागेत जाणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com