दाजीपूर-राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद

दाजीपूर-राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद

दाजीपूर-राधानगरी रस्ता वाहतुकीस बंद
सिंधुदुर्गनगरी ः देवगड-निपाणी-कलादगी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम करण्यासाठी एकूण तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असून हे काम १ एप्रिलपासून ३१ मेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद केला आहे. मुदाळ तिठा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी (स्वरुप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग व कोकणातील वाहने फोंडा घाट दाजीपूर कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळविण्यात येतील. कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव तरेळे वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येणार असून कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याशी मुदाळ तिठा-आजरा आंबोली-सावंतवाडी अशी वळविण्यात येणार आहेत.
..............
‘स्पर्श टिम’चा सोमवारी दौरा
सिंधुदुर्गनगरी : सी.जी.डी.ए. नवी दिल्ली यांच्यामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत येणाऱ्या ‘स्पर्श’शी संबंधित अडचणींचा निपटारा करण्यासाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी सैनिकी मुलांचे वसतुगृह, चिपळूण येथे २७ ते २९ मार्च दरम्यान त्यांच्या स्पर्श टिमचा दौरा आयोजित केला आहे. जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, अवलंबित यांना ‘स्पर्श’ पेन्शन योजनेबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com