महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी माने

महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी माने

91260

महिला मोर्चा जिल्हा
सरचिटणीसपदी माने
देवगड, ता. २४ : भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी येथील नगरसेविका प्रणाली माने यांची नियुक्ती करण्यात आली. ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी ही निवड केली. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते माने यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नियुक्तीपत्राद्वारे केले आहे.
.......................
कुडाळात सोमवारपासून
‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव’
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ः ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्ह्यात २७ व २८ मार्च या कालावधीमध्ये महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेलजवळ,. कुडाळ येथे दोन दिवसांचे ‘सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन केले आहे. २७ ला सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथोत्सव व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी दिली. सोमवारी सकाळी ९ वाजता रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय, कुडाळ (जिल्हा ग्रंथालय) ते महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे नगराध्यक्ष आफ्रिन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या हस्ते ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुंबईचे ग्रंथालय संचालक द. अ. क्षीरसागर, मुंबई विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कोमसाप अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष अनंत वैद्य आदी उपस्थिती राहणार आहेत.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com