कामगारांना संघटित करण्याचे प्रयत्न

कामगारांना संघटित करण्याचे प्रयत्न

91270
नेरूर : बांधकाम कामगार कल्याणकारी संघटनेच्या बैठकीत बोलताना सरपंच भक्ती घाडी, बाबल नांदोसकर आदी.

कामगारांना संघटित करण्याचे प्रयत्न

बाबल नांदोस्कर : नेरूर येथे मार्गदर्शन

कुडाळ, ता. २५ : बांधकाम कामगार संघटीत झाला पाहिजे .शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठीच आम्ही तळागाळातील कामगारांपर्यंत पोचून त्यांना संघटीत करण्यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे अध्यक्ष बाबल नांदोस्कर यानी नेरूर येथे केले .
कामगार कल्याण संघ सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून नेरूर ग्रामपंचायत येथे कामगारांसोबत सहविचार सभा झाली. यावेळी मध्यान्ह भोजन, कामगार योजन नोंदणी, नूतनीकरण, शिष्यवृती इतर लाभ योजना, हत्यार खरेदी, सुरक्षा संच घरकुल योजना, पेन्शन योजना यासाठी संघटना प्रयत्न करत आहे. याविषयावर चर्चा झाली. यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडी, संघटना पदाधिकारी सचिव रविंद्र साळकर, सदस्य अनिल कदम आदी उपस्थित होते. यावेळी नांदोसकर म्हणाले, ‘‘शासन दरबारी आपले अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी सर्वप्रथम सर्वजण एका छत्राखाली आले पाहिजे. संघटित झाले पाहिजेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आपण जागे झाले पाहिजे.’’ दरम्यान, कामगारांना मिळणाऱ्या योजनांसंदर्भातील अन्यायकारक नियम व अर्ज मंजुरीची क्लिष्ट पद्धतबाबत माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com