अपुर्‍या औषध पुरवठ्यामुळे सावंतवाडीत रुग्णाचे हाल

अपुर्‍या औषध पुरवठ्यामुळे सावंतवाडीत रुग्णाचे हाल

अपुऱ्या औषध पुरवठ्यामुळे
सावंतवाडीत रुग्णांचे हाल
सावंतवाडी, ता. २५ : येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या औषध पुरवठ्यावरून येथे रुग्णांचे हाल होत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी याबाबत आक्रमक भूमिका जाहीर केल्यानंतर रक्तदाता संघटना, सामाजिक बांधिलकी आणि जीवनरक्षा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आज वैद्यकीय अधिकाऱ्यां‍ची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनीच या संदर्भात स्वतः खंत व्यक्त केली. औषध पुरवठा वेळेवर होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना साधे टीटी सारखे इंजेक्शनही बाहेरून आणून देण्यास सांगायला आम्हाला लाज वाटत आहे. त्यामुळे आम्ही तरी करायचे काय? असा उलट प्रश्न अधिकाऱ्यांनी केल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com