राजेश म्हापणकर यांच्या
गीताचा लोकार्पण सोहळा

राजेश म्हापणकर यांच्या गीताचा लोकार्पण सोहळा

राजेश म्हापणकर यांच्या
गीताचा लोकार्पण सोहळा
म्हापण ः म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा (सातेरी) देवीच्या गुढीपाडवा उत्सवाचे औचित्य साधून म्हापणचे सुपुत्र व नवी मुंबई येथील रहिवासी राजेश म्हापणकर यांच्या ‘म्हापण ग्रामी वसलीस आई’, या गीताचा लोकार्पण सोहळा शांतादुर्गा मंदिरात भक्तांच्या साक्षीने व उद्योजक ठाकुर यांच्या हस्ते झाला. अनिल म्हापणकर यांनी यापूर्वी प्रदर्शित केलेल्या ‘आई कृपा कर’ या भक्तीगीत सीडीच्या प्रेरणेतून राजेश म्हापणकर यांनी ‘म्हापण ग्रामी वसलीस आई’ या गीताची निर्मिती केली आहे. नवी मुंबई-घणसोलीचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या मिनल म्हापणकर, गीत रचनाकार भाई साटेलकर म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण, माजी सरपंच अभय ठाकुर, माजी सरपंच नाथा मडवळ, जगन्नाथ संगीत विद्यालयाचे पखवाज वादक महेश सावंत, मंदिराचे पुजारी दाजी घाडी आदी उपस्थित होते. दाजी जुवाटकर यांनी स्वागत केले. गीत लोकार्पण सोहळ्याला उपस्थित मान्यवर व हे गीत बनविण्यासाठी सहकार्य केलेल्यांना म्हापणकर यांनी शांतादुर्गा देवीची प्रतिमा देऊन सन्मानित केले. ‘म्हापण ग्रामी वसलीस आई’ हे गीत ध्वनीयंत्रणेवर प्रसारित करून लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गीतकार-संगीतकार नितीन मोरजकर यांचे ‘आई देवी शांतादुर्गेच्या’ या गीताला संगीत लाभले आहे. गीतकार भाई साटेलकर, गायक राजेश म्हापणकर, गायिका सुजाता माने, कोरस गीत सहाय्य साईशा परब आणि शंतनू परब यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे गीत रसिकांच्या पसंतीस उतरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com