विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी ठोस उपाययोजना करा

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी ठोस उपाययोजना करा

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी उपाययोजना करा

आमदार शेखर निकम ; विद्यार्थी, पालकांना होतो मनस्ताप

सावर्डे, ता. २५ ः नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना शासन परिपत्रकानुसार विद्यार्थीवर्गाला प्रवेशप्रक्रियेसाठी विविध दाखल्याची गरज लागते. या दाखले मिळवण्यासाठी तालुकापातळीवर विद्यार्थी व पालकवर्गाला खेटे मारावे लागतात. कधी अधिकारी नसतात तर कधी नेटवर्क नसल्याने तासनतास रांगेत उभे राहून उद्या या, असे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांची पिळवणूक होते. ती थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात याव्यात, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात करून शैक्षणिक धोरण अधिकाराच्या उदासिनतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व दाखला, नॉनक्रिमिलेयर, उत्पन्नाचा दाखला असे विविध दाखले मिळवताना कधी ऑनलाईन पद्धतीचा फटका बसतो तर कधी शासकीय आदेश नसताना संबंधित एखादा अधिकारी हे दाखले देण्यास स्थगिती देतो. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवणे अशक्य होते. त्यांना शैक्षणिक वर्षाच्या नुकसानीला सामोरे जावे लागते त्याचबरोबर हे दाखले मिळवण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर खेटे घालावे लागतात. यातून त्याच्या वेळेचा अपव्यय व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी निकम यांनी केली. दरम्यान, निकम यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून अशा अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षा संपत आल्याने नवीन प्रवेशप्रक्रियेला सुरवात होईल. त्यामुळे दाखले मिळवण्यासाठी शासन तातडीने प्रयत्न करणार का? असा सवाल आमदार निकम यांनी सभागृहात उपस्थित केला. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेऊन कारवाई करू, असे आश्वासित केले.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com